Maharashtra Weather Update | राज्यात पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस होणार; हवामानाचा अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Weather Update | मुंबई (Mumbai) आणि उपनगरात चांगला पाऊस झाला आहे. त्याचबरोबर ठाणे (Thane), पालघर (Palghar), वाशीम (Washim), यवतमाळ (Yavatmal), नंदुरबार (Nandurbar) या जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला. पुण्यात (Pune) पावसाची गती कमी झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने (Indian Meteorological Department) वर्तविलेल्या अंदाजानुसार आता पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाची (Maharashtra Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

सध्या राज्यात काही ठिकाणी पाऊस (Maharashtra Weather Update) पडत आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. तर काही ठिकाणी पावसाची प्रतीक्षा आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना (Farmer) पावसाची गरज आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्र (Madhya Maharashtra) आणि विदर्भात (Vidarbha) काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यासह (Marathwada) अन्य काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

 

वाशिम (Washim) जिल्ह्यात सर्वत्र पुन्हा जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण आहे. रिसोड तालुक्यातील कोयाळी परिसरात ढगफुटी सारखा पाऊस झाला. अनेक भागात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पेरणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा करावी लागली.

यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात तर मुसळधार कोसळलेल्या पावसाने सावरगाव, गोळेगाव,
ब्राह्मणवाडा, शिरजगाव,पांढरी, पिंपळगाव काळे शिवारातील जवळपास 114 हेक्टर
जमिनीवरील पिके पूर्णतः उध्वस्त झाल्याचा अंदाज आहे. एका पावसाने शेतकरी उघड्यावर पडले आहे.

 

दरम्यान, पालघर (Palghar) जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.
जिल्ह्यातील सर्वात जास्त क्षमता असलेल्या सूर्या प्रकल्पातील धामणी धरणामध्ये तब्बल 50 टक्के पाणीसाठा झाला.
या धरणाच्या खाली असलेले कवडास धरण (Kavadas Dam) ओव्हरफ्लो (Overflow) झाले आहे.
धरण क्षेत्रामध्ये 1 जूनपासून आतापर्यंत एकूण 1 हजार 739 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

 

 

Web Title :  Maharashtra Weather Update | maharashtra rain heavy rain is likely in the state for the next five days

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा