‘ब्रह्मास्त्र’पूर्वी ‘या’ प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार ‘रणबीर-आलिया’ ! ‘ई-रिक्षा’त बसून काढला ‘असा’ फोटो

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अ‍ॅक्ट्रेस आलिया भट (Alia Bhatt) एकमेकांना डेट करत आहेत. हे सर्वांनाच माहित आहे. लवकरच दोघं लग्न करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. रणबीर आणि आलिया ब्रह्मास्त्र या सिनेमात पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. या सिनेमामुळंही हे कपल चर्चेत आहे. नुकतेच त्यांचे काही फोटो समोर आले आहेत जे व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोत रणबीर आणि आलिया ई रिक्षात बसलेले दिसत आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार ही एक जाहिरात आहे जी एका चिप्स कंपनीची आहे. फोटोत दिसत आहे की, आलिया आणि रणबीर ई रिक्षात एकमेकांसमोर बसलेले आहेत.

आलिया आणि रणबीरचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यांच्या अनेक चाहत्यांनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे.

आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र या सिनेमात काम करताना दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत आहे. या सिनेमाच्या निमित्तानं आलिया-रणबीर पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. याशिवाय आलिया करण जोहरच्या तख्त सिनेमातही दिसणार आहे. इतकंच नाही तर तिच्याकडे गंगुबाई काठियावाडी हा सिनेमादेखील आहे.