स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ‘त्या’ मतदारसंघात राष्ट्रवादीकडून पाठिंबा

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली यात हातकणंगले मतदार संघातून राष्ट्रवादीचा वेगळा उमेदवार न सांगता जयंत पाटील यांनी स्वभिमानी शेतकरी संघटनेसोबत आघाडी केल्याचे म्हंटले.  म्हणजेच राष्ट्रवादीकडून राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. हातकणंगले मतदार संघाची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आली आहे.
यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी सांगितले की, ‘राष्ट्रवादीकडून राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा देण्यात आला आहे. तसेच हातकणंगले मतदार संघाची जागा ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला  सोडण्यात आली आहे. राजू शेट्टी यांच्यासोबत आम्ही चर्चा केली आहे स्वाभिमानीचा जो उमेदवार या ठिकाणी उभा राहिल त्याला पाठिंबा देण्यात येणार असे देखील जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.
दरम्यान जर आघाडीत सामील झालो नाही तर राजु शेट्टी आणि महादेव जाणकर चौथी आघाडी स्थापन करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र आता जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीकडून स्वाभिमानाला पाठिंबा दिल्यामुळे या चर्चाना  पूर्णविराम मिळाला आहे.

ह्याहि बातम्या वाचा –

जनतेशी माझी युती, जनता जनार्दन पाठीशी, मग काय कुणाची भीती

#Loksabha : राष्ट्रवादीकडून 11 जणांना अधिकृत उमेदवारी जाहीर

‘या’ लोकसभा मतदार संघात काँग्रेसच्या यादीत असू शकते राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचे नाव

काँग्रेसच्या ‘या’ बालेकिल्ल्यातच राहुल गांधींविरोधात ‘पोस्टरबाजी’

काठ्या, चष्मे वाटणे, त्याला विकास म्हणत नाही ; शिवतारेंचा सुप्रिया सुळेंवर निशाणा