Alia Bhatt | आलियाच्या बॅगमध्ये तिच्या पेक्षा राहाचे सामान असते जास्त; “माझी बॅग आता माझी राहिली नाही”

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही तिचा आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आलिया सोबत या चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) देखील झळकणार आहे. रणवीर व आलिया सध्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. दरम्यान एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने मान्य केले आहे की आई झाल्यापासून तिच्या बॅगमध्ये तिच्यापेक्षा तिच्या मुलीचे सामान जास्त असते. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री आलिया भट्ट 2022 च्या एप्रिलमध्ये अभिनेता रणबीर कपूर सोबत विवाहबंधनात (Alia And Ranbir marriage) अडकली. त्यानंतर नोव्हेंबर मध्ये तिने गोंडस मुलीला (Alia Bhatt Daughter) जन्म दिला. आलिया व रणबीर च्या मुलीचे नाव ‘राहा’ (Raha Kapoor) असे आहे. आलियाने राहा च्या जन्मानंतर लगेचच कामाला सुरुवात केली असली तरी ती तिच्या मुलीला वेळ द्यायला विसरत नाही. अनेकदा ती तिच्या मुलीसोबत प्रवास देखील करते. अशा वेळी आलियाकडे नेहमी भली मोठी बॅग असते. यामध्ये जास्त सामान हे राहाचे असते आलियाने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

आलिया म्हणाली की, “प्रवासामध्ये जास्त सामान हे राहाचेच असते. एकदा मुंबईहून लंडनला जाताना माझ्या बॅगेचा माझ्याशी काहीही संबंध नाही हे मलाच जाणवलं. त्यात फक्त माझा पासपोर्ट होता. याशिवाय एक रुमाल, एक सामान्य कापड, राहाचे हातमोजे, एक अतिरिक्त मोजे, एक खेळणी, एक लहान पुस्तक होते. त्यावेळी मला वाटले, ठीक आहे, आता माझी बॅग राहाची बॅग झाली आहे. ही आता माझी बॅग राहिलेली नाही.” आलियाने तिच्या बॅगेमध्ये राहाचे सामान असते हे कबुल केले. तिची ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तसेच आलिया तिच्यासोबत प्रवासामध्ये हॅंडबॅग काय सामान घेते असा प्रश्न देखील तिला केला. तेव्हा आलियाने सांगितले की, ब्लूटूथ डोंगल, तिचा आवडते सनग्लासेस, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, केसांचे भरपूर रबर, लिप बामचा सेट, लिपस्टिक, आय ड्रॉप्स, रणबीरने भेट दिलेले ब्रेसलेट, किंडल आणि आय मास्क असे सामान आलिया तिच्या हॅंडबॅगमध्ये ठेवते हे तिने सांगतिले.

अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही लवकरच मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.
तिचा व रणवीर सिंगचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
येत्या 28 जुलैला हा चित्रपट प्रदर्शित (RARKPK Release Date) होणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहर
(Karan Johar) याने केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दरडी हटवण्यासाठी पुन्हा ब्लॉक,
उद्या (गुरूवारी) ‘या’ वेळेत प्रवास टाळा