रणबीर कपूर सोबतच्या लग्नाबाबत आलीय भट म्हणाली … 

मुंबई : वृत्तसंस्था – आलिया भट आणि रणबीर कपूर या दोघांच्या नात्याची चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये सारखी होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी हे लव्ह बर्डस एकत्र दिसून येतात. अनेक वेळा आलिया भटला रणबीर कपूरच्या कुटुंबासोबतही पहिले आहे. आलियाने तर न्यू ईअरचे सेलिब्रेशन सुद्धा कपूर कुटुंबासोबत केले होते. तेव्हा सुद्धा या दोघांच्या नात्याविषयी चर्चा रंगल्या होत्या. एका मुलाखतीत रणवीरने रिलेशनशीपमध्ये असल्याचे कबूल केले. मात्र कोणाचे नाव सांगितले नव्हते. आता पहिल्यांदाच आलियाने यावर खुलासा केला आहे.

नुकतीच आलिया भट तिच्या आगामी चित्रपट गली बॉय च्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमात गेली होती. या ठिकाणी तिला रणबीर कपूरशी लग्नासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर आलिया म्हणाली, ”मला वाटते लोकांनी आता लग्नाच्या विषयातून जरा ब्रेक घेतला पाहिजे. गतवर्षी दोन सुंदर लग्न आपण बघितली.’पुढे आलिया म्हणाली, सध्या फक्त सिनेमात काम करायला पाहिजे आणि पुढेच पुढे बघता  येईल.” तिने केलेल्या या वक्तव्यामुळे  तिचा सध्या तरी लग्नाचा विचार नाही असेच दिसून येते.

सध्या आलिया गली बॉय चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये बिझी आहे. तिचा हा चित्रपट १४ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. याशिवाय आलिया  भट लवकरच रणबीर कपूर सोबत ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात दिसून येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे.