Gangubai Kathiawadi : 200 डान्सर्स सोबत डान्स करणार आलिया भट ! आयकॉनिक असेल गाणं

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस आलिया भट (Alia Bhatt) हिनं अलीकडेच संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) डायरेक्टेड गंगुबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) सिनेमाची शुटींग सुरू केली आहे. हा सिनेमा डिसेंबर 2019 मध्ये सुरू करण्यात आला होता. कोरोना व्हायरस लॉकडाऊमुळं सिनेमाच्या शुटींगला ब्रेक लागला होता. यानंतर पुन्हा शुटींग सुरू झाली आहे. सिनेमाचा अधिकाधिक भाग शुट करण्यात आला आहे.

2002 साली रिलीज झालेल्या देवदास मधील डोला रे डोला गाणं असो किंवा मग 2015 साली रिलीज झालेल्या बाजीराव मस्तानीमधील पिंगा साँग असो संजय यांच्या सिनेमातील गाणी कायमच आयकॉनिक राहिली आहेत. आता अशी माहिती आहे की, गंगुबाई काठियावाडी सिनेमातही संजय लीला भन्साळी काही डान्स नंबर्स टाकणार आहेत. याची शुटींग फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू केली जाणार आहे.

https://www.instagram.com/p/B9mRU9Kj8ZB/?utm_source=ig_embed

दिसणार 200 हून अधिक बॅकग्राऊंड डान्सर्स

एका रिपोर्टनुसार, सध्या आलियाला थोडा ब्रेक देण्यात आला आहे. तिला 2 गाण्यांच्या रिहर्सलसाठी वेळ मिळाला आहे. यातील एक तर टिपिकल भन्साळी नंबर असेल ज्याला खूप लॅविश अंदाजात 200 पेक्षा जास्त बॅकग्राऊंड डान्सर्स घेऊन शुट केलं जाणार आहे.

आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र या सिनेमात काम करताना दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत आहे. या सिनेमाच्या निमित्तानं आलिया-रणबीर पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. याशिवाय आलिया करण जोहरच्या तख्त सिनेमातही दिसणार आहे. इतकंच नाही तर तिच्याकडे गंगुबाई काठियावाडी राजामौली यांचा आरआरआर हे सिनेमेदेखील आहेत.