Alibaug Crime News | कारच्या धडकेत सहायक पोलीस निरीक्षकाचा मृत्यू

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाइन – Alibaug Crime News | भरधाव कारची दुचाकीला धडक बसून सहायक पोलीस निरीक्षक दारासिंग पावरा (API Darasingh Pawara) यांचा मृत्यू (Accidental Death) झाला. पावरा हे जिल्हा पोलीस मुख्यालयात (District Police Headquarters) कर्तव्यावर होते. पोयानाड येथे कामानिमित्त जात असताना गुरुवारी (दि.9) सायंकाळी हा अपघात झाला. पावरा यांच्या अपघाती निधनामुळे (Alibaug Crime News) त्यांच्या कुटुंबावर व पोलीस दलावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरुन पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

दारासिंग पावरा हे मूळचे नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar District) असून रायगड पोलीस दलात (Raigad Police) ते कार्यरत आहेत. नुकतेच त्यांना सहायक पोलीस निरीक्षक पदावर बढती मिळाली होती. अलिबाग पोलीस मुख्यालयात ते कर्तव्य बजावत होते. गुरुवारी सायंकाळी अलिबाग वडखळ रस्त्याने दुचाकीवरुन पोयनाड येथे जात होते. त्यावेळी मागून आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत पोवरा हे खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यांना तातडीने अलिबाग जिल्हा रुग्णालायत दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. (Alibaug Crime News)

 

अपघाताची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (SP Somnath Gharge) यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.
त्यांनी पावरा यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सात्वन केले. पावरा यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
पावरा यांच्यावर नंदुरबार येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

 

Web Title :- Alibaug Crime News | assistant police inspector dara singh pawara died in the accident

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune News | शनिवारी परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत होणार महारोजगार मेळावा, विवाह संस्कार मेळावा

Chinchwad Bypoll Election | ‘मला चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत यश पाहिजे’; अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना ठणकावले

Aurangabad Crime | बापाच्या दारू पिण्याच्या सवयीला वैतागून पोटच्या मुलांनीच केली बापाची हत्या