‘बंद खोलीच्या आत घडणाऱ्या घटनांवर SC/ST कायदा लागू नाही’, अलाहाबाद HC चा आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत मंगळवारी अलाहाबाद हायकोर्टाने एक महत्त्वपूर्ण आदेश दिला. हायकोर्टाने म्हटले आहे की एससी-एसटी कायदा तेव्हाच लागू होईल जेव्हा पब्लिक व्यूव्ह (ज्या घटनेस इतर लोकांनी पाहिले असेल) मध्ये घटना घडली असेल. कोर्टाने आपल्या निर्णयामध्ये म्हटले आहे की बंद खोलीत घडलेल्या घटनेत एससी-एसटी कायद्यातील कलमे लागू होणार नाही.

अलाहाबाद हायकोर्टाने सांगितले की बंद खोलीत काय घडले हे बाहेरील कोणालाही माहित नसते. यामुळे समाजात त्या व्यक्तीच्या प्रतिमेवर कोणताही परिणाम होणार नाही. या प्रकरणात एससी-एसटी कायद्यांतर्गत हा खटला चालणार नाही. सोनभद्रचे रहिवासी के.पी. ठाकूर यांनी याचिका दाखल केली होती, त्यावर कोर्टाने आपला निर्णय दिला. न्यायमूर्ती आर.के. गौतम यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे.

याचिकाकर्ता के.पी. ठाकूर यांनी विनोद कुमार तनय यांच्याविरोधात चौकशी सुरू केली होती. या याचिकेत म्हटले आहे की ठाकूर यांनी तनय यांना त्यांच्या कक्षात बोलावून घटना रेकॉर्ड करण्यास सांगितले. तनय आपल्या सोबत एक खासदार तिवारी यांना घेऊन गेले होते. ठाकूर यांनी तिवारींना कक्ष सोडून जाण्यास सांगितले. यानंतर तनय यांनी न्यायिक दंडाधिकाऱ्यांसमोर ठाकूर यांच्याविरोधात एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. कोर्टाने ठाकूर यांना समन्स बजावले असता ते अलाहाबाद उच्च न्यायालयात गेले. याचिकेत म्हटले आहे की फिर्यादीला तपासात अडथळा आणण्याची सवय आहे. यामुळे त्याने एससी-एसटी कायद्याच्या कलमांखाली प्राणघातक हल्ला, जीवे मारण्याची धमकी यासाठी गुन्हा दाखल केला आहे.

You might also like