सेवानिवृत्तीच्या दिवशीच आलोक वर्मा यांचा राजीनामा नामंजूर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) संचालक पदावरून दूर केल्यानंतर आलोक वर्मा यांची नव्या खात्यात बदली करण्यात आली होती. मात्र त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. आलोक वर्मा यांनी नव्या खात्याचा दिलेला राजीनामा केंद्राने नाकारला आहे. त्यामुळे आज ते निवृत्त होत असतानाही कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे.

अलोक वर्मा यांची फायर सेवा, नागरी सुरक्षा आणि होमगार्ड या खात्यात संचालक पदावर त्यांची बदली करण्यात आली होती. ज्या पदावर आलोक वर्मा यांची बदली करण्यात आली होती. त्या पदासाठी असलेले ठरावीक वय त्यांनी ओलांडले आहे. त्यानंतरही त्यांना या पदावर बदली करण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी या पदाचा राजीनामा केंद्राकडे दिला होता. त्यानंतर केंद्राने त्यांचा राजीनामा रद्द करुन सेवेवर रुजू होण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे आलोक वर्मा आज सेवानिवृत्त होणार आहेत .

काय आहे प्रकरण –

सीबीआयचे संचालक आणि उपसंचालक यांच्यात वाद सुरू असताना केंद्र सरकारने हस्तक्षेप करून संचालक आलोक वर्मा यांनी सक्तीच्या रजेवर पाठवले होते. त्यानंतर वर्मा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा केंद्रीय दक्षता आयोगाचा (सीव्हीसी) निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आलोक वर्मा यांची ९ जानेवारीला त्यांना सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयचे संचालक पद बहाल केले होते. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी १० जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील निवड समितीने त्यांची बदली फायर सेवा, नागरी सुरक्षा आणि होमगार्ड या खात्यात संचालक पदावर केली होती. आलोक वर्मा यांची बदली झाल्यानंतर त्यांनी त्यांचे वय या पदासाठी जास्त आहे म्हणून एकाच दिवसात राजीनामा दिला होता.