अभिनेत्री अमाला पॉल म्हणते, लोकांच्या डोक्यात केवळ ‘कचरा’, त्यांना चित्रपटातील केवळ ‘न्यूड’ सीनमध्ये ‘रस’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री अमाला पॉल आजकाल आपला आगामी सिनेमा आदाईमुळे चर्चेत आहे. या सिनेमात अमालाने एका रेप विक्टीमचा रोल केला आहे. या सिनेमासाठी स्क्रिप्टची डिमांड असल्याने अमालाने न्यूड शुट करण्याचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील मुद्द्यावर सोशल मीडियावर एका सिनेमातील न्यूड सीनवर चर्चा होताना दिसत आहे. ज्या काळात महिलांच्या अधिकारांचं सोशलवर समर्थन होत आहे अशा काळात एखाद्या अभिनेत्रीच्या न्यूड सीनमुळे तिला ट्रोल करणं हे समाजाची मानसिकता दाखवत असतं. सिनेमातील सेंसीटीव कंटेटचे अनेक टीव्ही आणि फिल्म स्टार्सने कौतुक केले आहे.

काय आहे आदाई ?

आदाई हा एक थ्रिलर ड्रामा सिनेमा आहे. रत्ना कुमार यांनी हा सिनेमा डिरेक्ट केला आहे. विजी सुब्रमनियम, वी स्टुडिओजने या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमाचा टीजरही समोर आला आहे. या टीजर मध्ये एक काळजीत पडलेली आई आपल्या हरवलेल्या मुलीची तक्रार दाखल करायला जाते. आधी तिची दखल घेतली जात नाही. परंतु पोलीस नतंर तपास सुरु करतात आणि ती मुलगी एका ऑफिसमध्ये तणावपूर्ण आणि नग्न अवस्थेत सापडते. 1.44 मिनिटांचा हा ट्रेलर आहे.

अमाला पॉलने या सिनेमात त्या मुलीची भूमिका साकारली आहे. या सिनेमात स्क्रिप्टची डिमांड असल्याने अमाला न्यूड झाली आहे. ही सिनेमा टीजर रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे. एका युजरने अमालाचे कौतुक करत म्हटले आहे की, “अमालाने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, ती प्रयोग करायला घाबरत नाही. बोल्ड रोल्सही ती सहज करते हे तिने दाखवून दिले आहे.”


अमालाने हा टीजर पोस्ट करताना लिहिले आहे की, “तुमच्या सहकार्यामुळे आणि प्रेमामुळे एका प्रवासाला सुरुवात करत आहे. तुमच्या प्रार्थनांमध्ये मला लक्षात ठेवा. माझ्यासाठी प्रार्थना करा. कारण माझा आदाई सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे.”

2009 अमालाने आपल्या करिअरला सुरुवात केली. तिने मल्याळम, तामिळ, तेलुगू आणि कन्नड सिनेमातही काम केले आहे. तिने याआधीही आपल्या रोलसोबत अनेक प्रयोग केले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

सततचा तणाव शरीरासह मनावरही परिणाम करतो, हे आहेत उपाय

एक लिंबू ठरते आरोग्यासाठी फायदेशीर

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

मधमाशी चावल्यावर वेदना कमी होण्यासाठी करा ‘हे’ उपाय

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

सिने जगत

9 वर्षानंतर ‘खिलाडी’ सोबत कतरिना काम करण्यास ‘उत्सुक’

…म्हणून अभिनेत्री उर्वशी रौतेला ‘ भडकली ‘ तिच्या X ‘ पीआर ‘वर