Amazon चा ग्रेट इंडियन सेल सुरु, लेटेस्ट ‘स्मार्ट’फोनवर 10,000 रुपयांपर्यंत ‘डिस्काऊंट’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Amazon ग्रेट इंडियन सेल 2020 ची सुरुवात प्राइम मेंबर्ससाठी दुपारी 12 पासून सुरु झाली आहे. हा सेल 22 जानेवारीपर्यंत सुरु राहिल. या सेलमध्ये ग्राहकांना OnePlus 7T, Redmi Note 8 Pro आणि iPhone XR सारख्या स्मार्टफोनवर मोठे डिस्काऊंट मिळणार आहे. नॉन प्राइम मेंबर्ससाठी सेलची सुरुवात आज रात्री 12 वाजता सुरु होईल. ग्राहकांना स्मार्टफोनवर 40 टक्के सूट मिळणार आहे.

लॅपटॉप्स आणि कॅमेऱ्यावर 60 टक्क्यापर्यंत सूट ग्राहकांना मिळणार आहे. लॅपटॉप्सवर 35,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट आहे, तसेच एक्सचेंज ऑफर देखील आहे. तसेच एसबीआय क्रेडिट कार्ड ग्राहकांना 10 टक्के इंस्टंट डिस्काऊंटचा फायदा देखील मिळेल.

वन प्लस स्मार्टफोनवर बंपर सूट –
या सेलमध्ये OnePlus 7T वर डिस्काऊंट देऊन 34,999 रुपयांत उपलब्ध करुन देण्यात आला आहे आणि OnePlus 7T Pro तुम्ही 51,999 रुपयांत खरेदी करु शकता. या फोन्सवर डिस्काऊंट देण्यात आला आहे. तसेच एक्सचेंज ऑफर देखील आहे. सेलमध्ये Redmi Note 8 Pro वर 1,000 रुपये डिस्काऊंट मिळेल. Vivo U20 वर 2,000 डिस्काऊंट मिळत आहे त्यामुळे हा स्मार्टफोन 9,999 रुपयांत मिळेल. Oppo F11 वर 10,000 रुपये इतकी मोठी सूट देण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन फक्त 13,990 रुपयात उपलब्ध होईल.

अ‍ॅमेझान ग्रेट इंडियन सेल 2020 मध्ये प्रीमियम स्मार्टफोनवर सूट देण्यात आली आहे. यात iPhone XR, iPhone 11 Pro आणि Samsung Galaxy Note 10+ देखील सहभागी आहे. बजेट फ्रेंडली स्मार्टफोन Galaxy M30s ची विक्री 12,999 रुपयांत तर Galaxy M30 ची विक्री 8,999 रुपयात होत आहे.

Oppo Reno 2F आणि Vivo S1 ला एक्सचेंज अंतर्गत 3,000 रुपये अतिरिक्त सूट देण्यात आली आहे. Oppo Reno 10x Zoom च्या प्रीपेड ऑर्डर्सवर 6,000 रुपये डिस्काऊंट देण्यात आला आहे. तसेच सेलमध्ये Nokia 4.2 कमी किंमतीत उपल्बध करुन देण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like