Amazon च्या ‘सीक्रेट’ वेबसाइटवरून करा खरेदी, अर्ध्यापेक्षा कमी किमतीत मिळत आहेत प्रॉडक्ट, सणांमध्ये होईल मोठी बचत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सणाच्या काळात आपल्या हितचिंतकांना भेट देण्यासाठी ऑनलाइन शॉपिंग (Online Shopping) करणार असाल तर आम्ही तुम्हाला अमेझॉन (Amazon) च्या एका खास वेबसाईट बाबत सांगणार आहोत. अमेझॉन वेयर हाऊस (Amazon Ware House) नावाने चालणार्‍या या वेबसाइटवर ऑनलाइन शॉपिंग (Online Shopping) च्या द्वारे तुम्ही अर्ध्यापेक्षा कमी किमतीत पसंतीच्या वस्तू खरेदी करू शकता. या साइटवर 10,000 रुपयांचे प्रॉडक्ट अवघ्या 3 हजार रुपयात मिळतील.

 

अमेझॉनने चार कॅटेगरीत विभागले प्रॉडक्ट
अमेझॉन वेयर हाऊसवर तुम्हाला पहिल्यांदा ग्राहकांकडून परत करण्यात आलेले प्रॉडक्ट किंवा किरकोड डॅमेज्ड प्रॉडक्ट मिळतील. अमेझॉनने हे प्रॉडक्ट कंडीशनच्या आधारावर Like New, Very Good, Good आणि Acceptable कॅटेगरीत विभागले आहेत.

अमेझॉन वेयर हाऊसवर ग्राहक 12,000 च्या प्रॉडक्टच्या खरेदीत सुमारे 7-8 हजार रुपयांची बचत करू शकता.

 

कॉफी मशीन अवघ्या 2 हजारात
प्रेशर वॉशर (pressure washer) ची किंमत वेबसाइटवर सुमारे 20 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. हेच प्रॉडक्ट अमेझॉन वेयर हाऊसवर अवघ्या हजार रुपयांच्या जवळपास आहे. तर, नेसकॅफे सिंगल-सर्व कॉफी मशीनची किंमत येथे केवळ 2 हजार रुपये आहे. दुसर्‍या प्रमुख वेबसाइट्सवर त्याची किंमत 7 हजार रुपयांपर्यंत आहे.

 

अमेझॉन वेयर हाऊसची कस्टमर सर्व्हिस पॉलिसी
अमेझॉन वेयर हाऊस वेबसाइटवरून खरेदी करणार्‍यांना सुद्धा अमेझॉनप्रमाणे कस्टमर सर्व्हिस मिळते. याशिवाय अमेझॉनची रिटर्न पॉलिसी अंतर्गत ग्राहक येथून खरेदी केलेले प्रॉडक्ट सुद्धा पसंत न आल्यास परत करू शकतात.

असे केले जाते ग्रेडिंग
ग्राहकांना प्रॉडक्ट रिटर्न करण्यासाठी 30 दिवसांचा वेळ मिळेल.
अमेझॉननुसार, वेयर हाऊसवर प्रत्येक प्रॉडक्टची वर्किंग कॅपेसिटी आणि फिजिकल कंडीशन टेस्ट केली जात.
यानंतरच प्रॉडक्टचे ग्रेडिंग करून विकले जाते.

 

वेयर हाऊसवर आहेत 40,000 पेक्षा जास्त प्रॉडक्ट
अमेझॉन वेयरहाऊसच्या स्टॉकमध्ये 40,000 पेक्षा जास्त आयटम आहेत, जे ग्राहक अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकतात.
ग्राहकांना येथे सुमारे 34 सेक्शन मिळतील.

यामध्ये कम्प्युटर आणि एक्सेसरीज, घर आणि स्वयंपाक, खेळणी, व्हिडिओ गेम, इलेक्ट्रॉनिक्स आणि फोटोसह खुप काही मिळेल.

 

Web Title :- amazon secret website where customers can get products at less then 50 percent prices check details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nagpur Crime | लग्नाचे आमिष दाखवून उच्चशिक्षीत तरुणीसोबत शरिरसंबंध, दगाबाजी करणाऱ्या पुण्यातील अभियंत्यावर FIR

Money Transfer In Wrong Account | चुकीच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर झालेत? मग जाणून घ्या परत मिळविण्याची पध्दत; आरबीआयनं बनवलेत काही नियम

Pune Crime | पिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीचा भीषण अपघात ! दोघांचा जागीच मृत्यू, अपघातानंतर गाडीने घेतला पेट (व्हिडीओ)