Nagpur Crime | लग्नाचे आमिष दाखवून उच्चशिक्षीत तरुणीसोबत शरिरसंबंध, दगाबाजी करणाऱ्या पुण्यातील अभियंत्यावर FIR

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – लग्न करण्याची थाप मारुन एका उच्चशिक्षीत तरुणीशी शरिरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या पुण्यातील (Pune) एका तरुणावर नागपूरमध्ये (Nagpur Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीने नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात (Sitabardi Police Station) फिर्याद दिली आहे. गौरव जगनानी Gaurav Jaganani (वय-28 रा. पुणे) असे गुन्हा (FIR) दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गौरव हा पुण्यातील आयटी कंपनीत (IT company) काम अभियंता (Engineer) म्हणून कार्यरत आहे. याप्रकरणी नागपूरमधील (Nagpur Crime) एका 28 वर्षाच्या उच्चभ्रू कुटुंबातील तरुणीने फिर्याद दिली आहे. पीडित तरुणी एमकॉम झाले असून ती खासगी नोकरी करते.

पीडित तरुणी आणि आरोपी गौरव यांची मेट्रोमोनियल साईटवर (matrimonial site) ओळख झाली. दोघांनी एकमेकांना पसंत केल्यानंतर त्यांच्या घरच्यांनी लग्नाची बोलणी केली. लग्न पक्के झाले असताना गौरवने लग्नामध्ये किती खर्च करणार अशी विचारणी मुलीकडे केली. त्यावेळी तीने 15 ते 20 लाख रुपये खर्च करणार असल्याचे सांगितले असता गौरवने 40 लाखापर्यंत खर्च करण्याची अट घातली. यावरून दोघांच्या लग्नाची बोलणी फिसकटली.

यानंतर काही दिवसांनी गौरवने तरुणीसोबत संपर्क साधून तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे म्हणत नागपूर (Nagpur Crime) गाठले. या ठिकाणी एका हॉटेलमध्ये तो थांबला होता. 15 ते 18 सप्टेंबर 2021 या कालावधीत त्याने तरुणीला हॉटेलमध्ये बोलावून घेतले. एका धार्मिक ठिकाणी तिच्यासोबत लग्न करुन परत येतो असे म्हणून तो पुण्याला निघून आला. तीन आठवडे झाले तरी तो परत येत नसल्याने तरुणीने घेऊन जाण्यासाठी तगादा लावला.

परंतु आरोपी गौरव याने तिच्याकडे दुर्लक्ष केले. लग्नाची थाप मारुन शरिरसंबंध प्रस्थापित (sexual intercourse) केले
आणि हुंड्यासाठी लग्न मोडल्याची भावना तरुणीची झाली. तीने थेट सिताबर्डी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
तिने नोंदविलेल्या तक्रारीवरुन शनिवारी (दि.16) रात्री सीताबर्डी पोलिसांनी आरोपी गौरव जगनानीविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करणार आहे.

 

नागपूर पोलीस पुण्यात येणार

तरुणीशी हॉटेलमध्ये दोन दिवस शरिरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या गौरवने तिला सोबत नेले नाही.
उलट पुण्याला गेल्यानंतर तिला एक नोटीस पाठवली.
त्यात धाकदपट करुन जबदस्तीने लग्न लावून घेतल्याचा आरोप त्याने केल्याचे समजतेय.
दरम्यान, आरोपी गौरवला ताब्यात घेण्यासाठी सीताबर्डी पोलीस ठाण्याचे एक पथक पुण्याला जाणार असल्याची माहिती आहे.

 

Web Title :- Nagpur Crime | fraud after rape intercourse rape case filed against engineer pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Money Transfer In Wrong Account | चुकीच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर झालेत? मग जाणून घ्या परत मिळविण्याची पध्दत; आरबीआयनं बनवलेत काही नियम

Pune Crime | पिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीचा भीषण अपघात ! दोघांचा जागीच मृत्यू, अपघातानंतर गाडीने घेतला पेट (व्हिडीओ)

Blood Group And Heart Disease | ‘या’ ब्लड ग्रुपच्या लोकांना लवकर घेरतात हृदयाचे आजार, ‘ही’ आहेत कारणे