Pune Crime | पिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीचा भीषण अपघात ! दोघांचा जागीच मृत्यू, अपघातानंतर गाडीने घेतला पेट (व्हिडीओ)

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | भरधाव वेगात जाणारी दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात एक तरुण आणि एका तरुणीचा जागीच मृत्यू (Pune Crime) झाला. हा भीषण अपघात रविवारी (दिय17) दुपारी पिंपरी चिंचवड मधील आकुर्डी येथील बजाज कंपनी (Bajaj Company Akurdi) समोर झाला. हा अपघात एवढा भीषण होता अपघातानंतर दुचाकीने पेट (Bike Fire) घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घडनास्थळी धाव घेतली. अपघाताची दृष्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीने रस्ता दुभाजकाला धडक दिली. यामध्ये 25 वर्षाच्या तरुणाचा आणि त्याच्यासोबत मागे बसलेल्या तरुणीचा जागीच मृत्यू (Death) झाला.
अपघातानंतर दुचाकीने पेट घेतला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने ही आग विझवली.
या अपघातामध्ये दोन महिला देखील जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

 

प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार, हा अपघात एवढा भीषण होता की, गाडी रस्ता दुभाजकाला धडकून तीन ते चार फुट उडाली.
गाडी भरधाव वेगात असल्याने मुलगा आणि मुलगी वेगवेगळ्या दिशेला पडले. अपघातानंतर गाडीने पेट घेतला.
तसेच या अपघातात एकाचा मेंदू उडून दूरवर फेकला (Pune Crime) गेला.

 

Web Title : Pune Crime | Two-wheeler accident in Pimpri Chinchwad! Both die on the spot, stomach taken by car after accident (video)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 2,680 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 54 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

स्पोर्ट बाईकची आवड असेल तर 16 हजारात घरी आणा Yamaha FZ 25, इतका द्यावा लागेल मासिक EMI