तरुणांसाठी सुवर्णसंधी ! तुमच्या ‘कमाई’साठी Amazon ची खास योजना, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑनलाईन उत्पादने विकणारी ऍमेझॉन (Amazon) या ई-कॉमर्स कंपनीने तरुणांना नोकरीसाठी कुशल बनवण्याचे ठरवले आहे. ऍमेझॉन तरुणांना कमाईसाठी तयार करण्यासह त्यांना नोकरी देखील मिळवून देण्यास मदत करणार आहे.

सुरु झाला कौशल्य विकास कार्यक्रम
ई-कॉमर्स कंपनी ऍमेझॉन इंडियाने अलीकडेच कौशल्य विकास कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कंपनी तरुणांना नोकरीसाठी नवीन संधी घेऊन येत आहे. कंपनीच्या मते, या कार्यक्रमाचे उद्दीष्ट १००० तरुणांना जोडणे आणि सक्षम करण्याचे आहे.

या कार्यक्रमात तरुणांना ६ महिने वेयरहाऊसिंग व इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचे प्रशिक्षण दिले जाईल. यामुळे ते वेयरहाऊस असोसिएट्स आणि प्रोसेस असोसिएट्सची भूमिका निभावण्यास सक्षम होतील. आमच्या सहकारी zeebiz.com च्या म्हणण्यानुसार हा कार्यक्रम खास बेरोजगार तरुणांसाठी आहे.

या कार्यक्रमाचे प्रशिक्षण दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबादमधील केंद्रांवर दिले जाईल. तेथे क्लासरूम ते ऑन-द-जॉब लर्निंग आणि मूल्यांकनाचे काम केले जाईल. यात तरुणांची निवड अनेक सोर्समधून केली जाईल, ज्यात एनएसडीसी-अधिकृत प्रशिक्षण केंद्र (DDU-GKY केंद्र) आणि एनएसडीसी कौशल्य डेटाबेस सामील आहेत.

कंपनी या कार्यक्रमांतर्गत भाग घेणार्‍या तरुणांना मासिक वेतनही देईल. तसेच या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या शेवटी या तरूणांचे मूल्यांकन लॉजिस्टिक सेक्टर स्किल कौन्सिल करेल आणि मूल्यांकनानंतर त्यांना प्रमाणपत्रही मिळेल. हंगामी किंवा पूर्णवेळ नोकरीसारख्या संधीही युवकांना मिळतील.