खुशखबर ! अ‍ॅमेझॉन करणार 75 हजार जणांची भरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या जगात आणि देशात कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढत चालला असून यामुळे १८ लाखापेक्षा जास्त लोक संक्रमित झाली आहेत. तर दुसरीकडे या महामारीमुळे जगात आर्थिक मंदी आली असून बऱ्याच लोकांच्या देखील नोकऱ्या जायची वेळ आली आहे. अशात ई-कॉमर्स कंपनी ऍमेझॉन आता जवळजवळ ७५ जणांना नोकरी देणार आहे.

यात वेयरहाउस स्टाफ ते डिलिव्हरी ड्रॉयव्हर्स इथपर्यंत जागा असतील. तर लॉकडाऊनमुळे ७५ हजार लोकांची भरती करणार असल्याचे कंपनीने सांगितले.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, लॉकडाऊनमुळे तर अमेरिकेत अनेक लोक घरीच आहेत. त्यामुळे ते ऑनलाइन ऑर्डर करत आहेत. बऱ्याच दिवसांपासून क्वारंटाइन असल्यामुळे किराणा दुकानातील मालदेखील संपत आला आहे. त्यामुळे कंपनीने खाद्यपदार्थांसहित आरोग्य संबंधित वस्तूंची डिलिव्हरी करण्याबाबत कंपनी विचार करत आहे. त्यामुळे ते स्टाफ वाढवणार असून वाढती बेरोजगारी बघता ऍमेझॉन नवीन कर्मचाऱ्यांना प्रतितास वेतन देण्याबाबत देखील विचार करत आहे.