Ambadas Danve | ‘…हीच तर भाजपची नीती’; अंबादास दानवेंचा भाजपवर घणाघात

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपला पक्ष फोडण्याची सवय असून त्यांनी याआधी देखील पक्षफोडीतून मध्यप्रदेश आणि कर्नाटकमध्ये स्वतःचे सरकार स्थापन केले आहे. स्वतःचा पक्ष वाढत नाही म्हणून भाजप इतरांचे पक्ष फोडते असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाजपवर केला. आज दि.९ यवतमाळ येथे आयोजीत करण्यात आलेल्या आक्रोश मोर्चात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपविरोधात तुफान फटकेबाजी केली. (Ambadas Danve)

 

अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले, सुरूवातीला भाजपने मी नाही त्यातला असे भासवले. स्वतः फडणवीस यांनी सांगितले आहे की, मी त्यांना फोन केला म्हणून. आणि आता त्यांच्या पत्नी सांगत आहेत की ते वेशांतर करून कुणाला तरी भेटायला जात होते. त्यामुळे या पक्षफुटीच्या राजकारणात भाजपचाच हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. असेही यावेळी बोलताना अंबादास दानवे म्हणाले.

 

तसेच मुंबई महापालिकेबाबत बोलताना अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले की, ‘मुंबईचा विकास शिवसेनेने चांगल्या पध्दतीने केला आहे. मुंबई पावसाळ्यात नेहमी तुंबत होती. ठाणे, नागपूर पावसाळ्यात तुंबल, मात्र मुंबई सुरक्षित राहिली. याला एकच कारण आणि ते म्हणजे महानगरपालिकेत शिवसेनेने केलेलं काम. आजही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी केलेलं काम याला कोणीही थांबू शकत नाही. आता शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेत फक्त उपभोग घेणे सुरू आहे. अवाढव्य पणे खर्च करणे चालू आहे. अधिकाऱ्यांवर दबाव आणणे चालू आहे. याचा धडा मुंबईकर हे यांना आगामी महापालिका निवडणुकीत शिकवणार आहेत.’ असे देखील अंबादास दानवे यावेळी बोलताना म्हणाले.

या आक्रोश मोर्चात बोलताना अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केंद्र सरकारच्या शेतकऱ्याबाबत असणाऱ्या धोरणावर देखील टीका केली. ते म्हणाले, ‘ऑस्ट्रेलियातून कापूस आयात करण्याचे धोरण हे पूर्णपणे चुकीचे आहे. आपल्या देशातच मोठ्या प्रमाणावर कापूस उत्पादन होते, तरीही कापूस आयात करावा लागतो. केवळ टेक्सटाईल उद्योगांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारचे हे आयात धोरण आहे. केंद्र सरकार हे व्यापाऱ्यांचे उद्योजकांच्या हिताचे आहे.’ असेही ते म्हणाले.

 

तसेच यावर पुढे बोलताना ते (Ambadas Danve) म्हणाले की, ‘शेतकऱ्यांचा हंगामातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे
कापसाला भाव या मागणीसह इतर मागण्यांसाठी आज हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे.
केंद्र शासनाचा आयात निर्यात धोरण हे शेतकऱ्यांच्या जीवावर उठत आहे.
केंद्र शासन उद्योजकांना व्यापाऱ्यांना सपोर्ट करते, म्हणून हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे.
सीसीआय आणि कापूस फेडरेशनचे कापूस खरेदी केंद्र हे तातडीने सुरू झाले पाहिजे.
शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत झाला पाहिजे, शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला पाहिजे,
अतिवृष्टीची मदत तातडीने मिळाली पाहिजे, त्यासाठीही हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे.’
असे यावेळी उपस्थितांना संबोधताना अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले.

 

Web Title :- Ambadas Danve | yavatmal divide and rule is bjp s policy said ambadas danve

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil | ‘इन्व्हेस्टमेंट मांगोगे, यूपी-गुजरात को देंगे’, जयंत पाटलांच्या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Former MLA Mohan Joshi | कर्नाटक विधानसभा निवडणूक निरीक्षकपदी मोहन जोशी

Anil Deshmukh | काटोल, नरखेड तालुक्यातील जनतेच्या प्रमुख मागणीचे अनिल देशमुखांकडून मुख्यमंत्र्याना पत्र…

MP Arvind Sawant | ‘राज्यातील सरकार घटनाबाह्य’, सत्तासंघर्षाच्या सुनावणीपूर्वी अरविंद सावंतांचा शिंदे सरकारवर घणाघात