ताज्या बातम्यामनोरंजन

Ameesha Patel | ‘या’ प्रकरणी अभिनेत्री अमिषा पटेल विरोधात वॉरंट जारी

भोपाळ : वृत्तसंस्था – Ameesha Patel | बाॅलीवूड अभिनेत्री अमिषा पटेल ( Ameesha Patel) आता एका प्रकरणामध्ये अडकली असल्याचं समोर आलं आहे. नुकतंच अमिषा पटेल ‘सकीनाच्या आयकॉनिक भूमिकेत दिसणार आहे. 2001 चा गदर रीमेक (Gadar movie) येणार आहे. तर दुसरीकडे एका प्रकरणात भोपाळच्या (Bhopal) एका न्यायालयाकडून (Court) अमिषा पटेलच्या नावे वॉरंट (Warrant) जारी करण्यात आला आहे.

 

एका वेबसाईटच्या माहितीनुसार, युटीएफ फिल्म्सने तिच्याविरोधात तक्रार केली होती. अमिषा पटेलने (Ameesha Patel) चित्रपटासाठी कंपनीकडून पैसे उधार घेतले होते. परंतु, पैसे परत करताना जो चेक दिला तो बाउन्स (Bounce) झाला. चेक बाऊन्सचे हे प्रकरण 32.25 लाख रुपयांशी संबंधित आहे. या दरम्यान, अमिषा पटेलला स्वत: न्यायालयात (Court) उपस्थित राहावं लागेल, असं न्यायालयाने सुनावणी दरम्यान सांगितलं आहे.

 

दरम्यान, 2001 मध्ये रिलीज झालेल्या ब्लॉकबस्टर ‘गदर’चा रीमेक येत आहे.
त्यामध्ये अभिनेता सनी देओल (Actor Sunny Deol) तारा सिंहच्या भूमिकेत तसेच
अमिषा पटेल सकीनाच्या भुमिकेत असणार आहे.
तर, 2001 मध्ये सनी देओलच्या मुलाची ज्याने भूमिका साकारली होती,
तो उत्कर्ष शर्मा यावेळी देखील जीते’च्या भूमिकेत दिसणार आहे.

 

Web Title :- Ameesha Patel | 32 lakh cheque bounce case bhopal court issues bailable warrant against actress ameesha patel

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Back to top button