Nawab Malik In Pune | आम्ही आता गप्प बसणार नाही, ‘भाजप नेते कोणाला तोंड दाखवू शकणार नाहीत’ ! लवकरच ‘हायड्रोजन बॉम्ब’ फोडणार; नवाब मलिक यांचा इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Nawab Malik In Pune | ED, CBI सारख्या यंत्रणांच्या कारवाईच्या माध्यमातून विरोधकांची बदनामी करून विरोधी पक्षांची सरकारे पाडणे आणि फोडाफोडीचे राजकारण भाजपने केले आहे. परंतू सात वर्षात एकही आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत, हे जनतेलाही समजले आहे. आम्ही आता गप्प बसणार नाही. भाजपशी (BJP) दोन हात करणार. माझ्याकडे ‘सीडी’ आहे. ती बाहेर काढल्यावर तेे लोक कोणाला तोंड दाखवू शकणार नाहीत असा इशारा देत केंद्रातही परिवर्तन करण्यासाठी समर्थ पर्याय उभारण्यात येईल, असा दावा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik In Pune) यांनी आज येथे दिला.

 

महाविकास आघाडीतील कॉंग्रेस (Congress), शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) संयुक्त विद्यमाने मागील काही दिवसांत केंद्रीय यंत्रणांच्या कथित कारवायांतील फोलपणा पुराव्यांनिशी उघड पाडल्याने प्रसिद्धीच्या झोतात आलेले राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik In Pune) यांचा आज जाहीर सत्कार करण्यात आला. आझम कॅम्पस येथे झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरअध्यक्ष प्रशांत जगताप, कॉंग्रेसचे शहरअध्यक्ष रमेश बागवे, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सत्काराला उत्तर देताना नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवितानाच लवकरच भाजपवर ‘हायड्रोजन बॉंम्ब’ फोडणार असल्याचा इशाराही दिला.

 

नवाब मलिक म्हणाले, भाजपने विरोधकांची बदनामी करून सत्ता मिळविली. सत्तेतून पैसा मिळविला. या पैशातून फोडाफोडीचे राजकारण करण्याशिवाय काहीच केले नाही. एनसीबी सारख्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून बड्या लोकांना ड्रग्जच्या केसमध्ये अडकवून खंडणीखोरीचा एकमेव धंदा केंद्र सरकार करत असून तो आम्ही उघडा पाडला आहे. एनसीबीच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम केले. महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे ईडी व अन्य यंत्रणा लावून त्यांची बदनामी केली. भाजपला जशास तसे उत्तर दिले जाईल. आम्ही गप्प बसणार नाही. लवकरच मोठा धमाका करणार असून त्यानंतर कोणाला तोंड दाखवू शकणार नाही. मी त्यांची झोप उडविल्याशिवाय राहाणार नाही, असा थेट इशाराच मलिक यांनी यावेळी दिला.

कुठलेही कतृत्व नसलेला भाजप केवळ विरोधकांची बदनामी करणारा पक्ष आहे.
पुलवामा हल्ल्यात आरडीएक्स कोठून आले, याचे साधे स्पष्टीकरण एवढ्या वर्षात ते देउ शकललेले नाहीत.
शिवसेनेच्या खांद्यावर बसून महाराष्ट्रात प्रस्थापित झालेल्याने भाजपने ज्यांच्या खांद्यावर बसतो त्यांचेच खच्चीकरण करतो हे दाखवून दिले.
ही चालाखी उद्धव ठाकरे यांच्या लक्षात येताच त्यांनी भाजपला बाजुला करून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत महाविकास आघाडी सरकार केले.
शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)
यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत आहे. जनतेचाही सरकारला भक्कम पाठींबा आहे.
हे सरकार पाच वर्षे नव्हे पुढील २५ वर्षे सत्ता करेल असा दावाही मलिक यांनी यावेळी केला.

 

केंद्रातील भाजप सरकारचा बुरखा फाटला आहे. देशात परिवर्तन करायचे ही शरद पवार यांची भुमिका आहे.
यासाठी पर्याय निर्माण करण्यासाठीच प्रयत्न सुरू आहेत.
यासाठी देशात कॉंग्रेससह सर्वच विरोधी पक्षांची भक्कम आघाडी करण्यासाठीच आम्ही प्रयत्नशील असून २०२४ च्या निवडणुकीमध्ये परिवर्तन घडवू,
असा विश्‍वासही नवाब मलिक यांनी यावेळी व्यक्त केला.

 

Web Title :- Nawab Malik In Pune | We will not remain silent now, ‘BJP leaders will not be able to face anyone’! The ‘hydrogen bomb’ will explode soon; Warning of Nawab Malik in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 47 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Bigg Boss 15 | राखीचा पती रितेशने केलं तेजस्वी प्रकाश सोबत ‘असं’ काही की तेजस्वी म्हणाली, ‘तरी सुद्धा हे लोक संस्कारांबद्दल बोलतात..’

CBDT ने दिड कोटीपेक्षा जास्त करदात्यांना दिला 1,29,210 कोटी रुपयांपेक्षा जास्त परतावा, जाणून घ्या टॅक्स रिफंड स्टेटस तपासण्याची प्रक्रिया