‘या’ किरकोळ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या अधिकाऱ्याला केलं ‘OUT’

वॉशिंगटन : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या विचित्र निर्णय घेण्यासाठी आणि रोखठोक भूमिकेसाठी ओळखले जातात. मात्र एका मुलाखतीदरम्यान त्यांच्या एका कृतीने त्यांच्या विचित्र निर्णय शैलीचा परिचय दिला. व्हाईट हाऊसचे मुख्य मिक मुलवाने यांना खोकला आल्याने त्यांना ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमधून बाहेर जायला सांगितले.

डोनाल्ड ट्रम्प हे बीबीसीसाठी मुलाखत देत असताना व्हाईट हाऊसचे मुख्य मिक मुलवाने यांना खोकला आला. त्यावेळेस ट्रम्प हे आयकर परताव्यावर बोलत होते. त्यामुळे मिक मुलवाने हे खोकल्यामुळे ट्रम्प यांना त्यावर पुन्हा बोलावे लागले. यामुळे राग आलेल्या ट्रम्प यांनी मिक मुलवाने यांना बाहेर जाण्यास सांगितले.

त्यानंतर ते बाहेर गेल्यानंतर ट्रम्प यांनी मुलाखतीला पुन्हा सुरुवात केली. ट्रम्प यांची मुलाखत काल वृत्तवाहिनीवर प्रसारित करण्यात आली. या मुलाखतीत ट्रम्प यांनी बराक ओबामा, मतदान प्रक्रियेतील गडबड त्याचप्रमाणे म्युलर प्रकरण या विषयांवर भाष्य केले. त्याचबरोबर राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रशियाची मदत घेतल्याचा आरोप नाकारत हे माध्यमांचे कारस्थान असल्याचे त्यानी म्हटले.

दरम्यान, या मुलाखतीत घडलेल्या या प्रसंगामुळे ट्रम्प यांची एकाधिकारशाही पुन्हा जगासमोर आली आहे. त्याचबरोबर माध्यमांना कशाप्रकारे व्हिलन बनवायचे हे देखील त्यांच्या या कृतीतून दिसून आले आहे.

सिने जगत –

बर्थडे स्पेशल : ‘या’ प्रसिद्ध गायिकेने सोशल मिडियावर ‘न्यूड’ होण्याची दिली होती ‘धमकी’

Video : जान्हवी कपूरचा ‘हा’ Belly डान्स पाहून यूजर्संनी दिला ‘सल्‍ला’, बघता-बघता व्हिडीओ ‘व्हायरल’

दोन पत्नीसोबत राहतो ‘हा’ मोठा सिंगर, ज्याचे आहेत लाखो ‘फॅन’

‘लस्ट स्टोरीज’मधील ‘व्हायब्रेटर सीन’बाबत कियारा आडवाणीचा मोठा ‘खुलासा’

You might also like