सावधान ! डोळ्यांच्या दोषांकडे करू नका दुर्लक्ष, वाढतो मृत्यूचा धोका

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – सामान्यपणे डोळ्यांची दृष्टी कमी होणे, वयोमानाचा परिणाम मानला जातो. परंतु नुकतेच एका संशोधनात आढळले की अंधत्व आणि दृष्टीदोष मृत्यूच्या धोक्याशी सुद्धा जोडलेला आहे. यासाठी हे आवश्यक आहे की, जागतिक स्तरावर आरोग्याच्या या समस्येला गांभिर्याने घेत त्याचे निदाण करण्याच्या दृष्टीने ठोस प्रयत्न केले पाहिजेत.

जगभरात ज्येष्ठांची संख्या वाढत आहे आणि यामुळे त्यांचे डोळे सुद्धा कमजोर होत आहेत. एका अंदाजानुसार, पुढील 30 वर्षात दृष्टीदोष किंवा अंधत्व आलेल्यांची लोकसंख्या दुप्पट होऊ शकते. ’लान्सेट ग्लोबल हेल्थ’मध्ये प्रकाशित एका विश्लेषणात सांगितले गेले आहे की, गंभीर दृष्टीदोष असलेल्या लोकांना सामान्य दृष्टी असलेल्या लोकांच्या तुलनेत मृत्यूचा जास्त धोका असतो. हे विश्लेषण सुमारे 48 हजार लोकांवर केलेल्या 17 अभ्यासांबाबत करण्यात आले आहे.

89 टक्के जास्त जोखिम
आकड्यांनुसार, सामान्य दृष्टीवाल्यांच्या तुलनेत अल्प दृष्टीदोष असलेल्या लोकांमध्ये मृत्यूचा धोका 29 टक्के जास्त आहे. तर गंभीर दृष्टीदोष असलेल्या लोकांमध्ये हा धोका 89 टक्के जास्त आढळून आला. परंतु, महत्वाची गोष्ट ही आहे की, जगभरात दृष्टीदोष असलेल्या प्रत्येक पाचपैकी चार व्यक्तींमध्ये ही गडबड रोखली किंवा बरी केली जाऊ शकते. कारण बहुतांश लोकांमध्ये दृष्टीदोषाचे मुख्य कारण मोतीबिंदू किंवा उपयुक्त चष्म्याचा अभाव असते.

वाढत्या वयाचा परिणाम
संशोधक जोशुआ एर्लिच यांनी हा अभ्यास दृष्टी दिव्यांगता आणि मृत्यूच्या कारणांमधील संबंध समजून घेण्यासाठी केला आहे. यापूर्वी सुद्धा एर्लिच यांनी आपल्या एका अभ्यासात सांगितले की, वाढत्या वयासोबत होणार्‍या दृष्टीदोषाने विस्मरण, औदसिन्य आणि दुसर्‍यांवर अवलंबित्व वाढू लागते.

निदान होणे यासाठी आवश्यक
दृष्टीदोषाच्या समस्येचे निदान करणे यासाठी सुद्धा आवश्यक आहे कारण हे केवळ पाहण्याची क्षमता प्रभावित करत नाही तर ती तुमच्या जीवनाच्या अनुभवावर सुद्धा विपरित परिणाम करते. या दृष्टीने हे विश्लेषण केवळ आरोग्य सुविधांसाठी महत्वाचे नसून पुनर्वसन आणि अंधत्व निवारणाला सुद्धा गती दिली जाऊ शकते आणि याद्वारे दिर्घायुष्य सुद्धा मिळवता येऊ शकते.