LAC वर भारतासोबत तणाव असताना चीनने पीएलएच्या वेस्टर्न थिएटर कमांडसाठी केली नव्या जनरलची नियुक्ती

बिजिंग : भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखमध्ये मागील मोठ्या कालावधीपासून वाद सुरू आहे. अशावेळी दोन्ही देश चर्चेतून तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत असताना चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी पीपुल्स लिब्रेशन आर्मी (पीएलए) च्या पश्चिम थिएटर कमांडसाठी कमांडर म्हणून नव्या जनरलची नियुक्ती केली आहे. हे कमांड चीन-भारत सीमेवर देखरेख ठेवते.

चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआनुसार, केंद्रीय सैन्य आयोग (सीएमसी) चे प्रमुख राष्ट्रपती जिनपिंग यांनी जनरल झांग शुडोंग यांना पश्चिम थिएटर कमांडचे नवीन कमांडर म्हणून नियुक्त केले. यानुसार, जिनपिंग यांनी जनरल झांग सह चीनी सेना आणि सशस्त्र पोलीस दलाच्या चार वरिष्ठ अधिकार्‍यांना पदोन्नती दिली आहे. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये मेपासून सुरू असलेल्या तणावादरम्यान पीएलएच्या पश्चिम कमांडमध्ये प्रमुख स्तरावर ही नियुक्ती करण्यात आली आहे.

जनरल झांग यांना पश्चिम थिएटर, तिबेट किंवा शिनजियांगमध्ये कोणताही मागील अनुभव नाही. त्यांनी आपले करियर पूर्वोत्तर शेनयांग सैन्य क्षेत्रात (आता उत्तर थिएटर कमांड अंतर्गत) केले आहे. याशिवाय राष्ट्रपती शी यांनी चार वरिष्ठ चीनी सैन्य आणि सशस्त्र पोलीस अधिकार्‍यांना पदोन्नती दिली आहे.

लडाखमधील तणाव दूर करण्यासाठी भारत आणि चीनमध्ये 18 डिसेंबरला परराष्ट्र मंत्रालय स्तरावर चर्चा झाली होती. या दरम्यान दोन्ही देशांनी एनएसीवर तणाव असलेल्या परिसरातून आपले सैनिक हटवण्यावर सहमती व्यक्त केली होती. दोन्ही पक्षांकडून लवकरच सैन्य चर्चा सुद्धा होणार आहे.