जम्मू-काश्मीरमध्ये ३० वर्षात ‘जे’ घडलं नव्हतं ‘ते’ गृहमंत्री अमित शहांनी घडवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंत्रिपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात शिस्त लावत मंत्रालयाचे कामकाज पाहत आहेत. आजपासून अमित शहा जम्मू -काश्मीर राज्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या या भेटीदरम्यान एक अशी गोष्ट घडली. जी गेल्या ३० वर्षाच्या कालखंडात कधीही घडली नव्हती. फुटिरतावादी नेत्यांकडून बुधवारी कोणत्याही प्रकारे बंद पुकारला गेला नाही. याअगोदर केंद्र सरकारचा कोणताही प्रतिनिधी राज्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर फुटीरतावाद्यांकडून बंदचे आवाहन करण्यात येत होते. त्यामुळे ३० वर्षानंतर या परंपरेत खंड पडल्याने भारतीय नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर असून ते लोकप्रतिनिधी आणि पंचायत सदस्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे.त्याचबरोबर राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी देखील ते चर्चा करणार आहेत. आज सकाळी ते श्रीनगरमध्ये पोहोचले. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांशी सुरक्षेसंबंधी चर्चा केली. त्याचबरोबर त्यांनी सुरक्षा यंत्रणांना कडक सुरक्षा ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अमरनाथ यात्रेच्या पार्शवभूमीवर त्यांनी सुरक्षा यंत्राणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

हुर्रियत कॉन्फरन्सचे सैयद अली शाह गिलानी किंवा मीरवाइज उमर फारुख किंवा इतर कोणत्याही नेत्याने बंदचे आवाहन केलेले नाही. त्याचबरोबर त्यांनी या दौऱ्याविषयी कोणतीही प्रतिक्रिया देखील व्यक्त केलेली नाही. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात देखील फुटीरतावाद्यांना बंद पुकारला होता. त्यामुळे अमित शहा यांच्या दौऱ्यावेळी सगळे शांत असल्याने अमित शहा यांचा दबदबा वाढल्याचे बोलले जात आहे.

आरोग्य विषयक वृत्त

संधिवाताच्या रुग्णांना कोणते खाद्यपदार्थ ठरू शकतात फायदेशिर, जाणून घ्या

समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे

आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय

हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक