Amit Shah On Lok Sabha Election 2024 | आम्ही 400 पार करणार, काँग्रेस 40 च्या खाली जाईल; अमित शाहांचा हल्लाबोल

हमीरपूर: Amit Shah On Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपाकडून 400 पार चा नारा दिला जात आहे . नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपला मत देण्याचे आवाहन त्या पक्षांच्या उमेदवारांकडून केले जात आहे. तसेच विरोधकांडे नरेंद्र मोदी यांच्या विरोधात चेहरा नसल्याचा प्रचारही केला आहे. (BJP Vs Congress)

अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पाच टप्प्यातील मतदान पार पडले असून दोन टप्प्यातील मतदान शिल्लक आहे. राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांना याबाबत विचारले असता हा एक भाजपाच्या प्रचाराचा भाग असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.(Amit Shah On Lok Sabha Election 2024)

पहिल्या पाच टप्प्यातील मतदानामध्ये भाजपाने 310 जागांचा टप्पा ओलांडला आहे. तर काँग्रेसला यावेळी 40 जागाही मिळणार नसल्याचा दावा शाह यांनी उत्तर प्रदेशमधील डूमरियागंज येथे भाजपा उमेदवार जगदंबिका पाल यांच्या आयोजित केलेल्या प्रचारसभेत केला होता.

आता त्यांनी हिमाचल प्रदेशातील हमीरपूरमध्ये काँग्रेसवर हल्लाबोल करताना “आम्ही ४०० करू काँग्रेस ४० च्या खाली जाईल”
असे वक्तव्य केले आहे. हमीरपूरमध्ये अनुराग ठाकूर यांच्या प्रचारसभेत बोलताना शाह यांनी हे वक्तव्य केले आहे.

तसेच पिओके हा भारताचा भाग आहे आणि तो आपण परत मिळवू, जरी काँग्रेस पाकिस्तान कडे अणुबॉम्ब असल्याचे
सांगत असले तरी भाजपाचे लोक अणुबॉम्बला घाबरत नाहीत , पिओके परत मिळवेल असे त्यांनी याही प्रचारसभेत सांगितले.

देशाचे पंतप्रधान पूर्णवेळ देशसेवा करतात. दिवाळी सुद्धा ते सैनिकांसोबत साजरी करतात. विरोधकांवर निशाणा साधताना
ते पुढे म्हणाले, ” विरोधक राम मंदिरात जायला घाबरतात कारण त्यांना आपली व्होट बँक जाण्याची भीती वाटते. “

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PCMC News | मंगळसूत्र विकून, सोने गहाण ठेऊन पूर रेषेतील बांधकामांसाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील अधिकाऱ्यांना पैसे दिल्याचा आरोप

Ravindra Dhangekar On Ajit Pawar | पोर्शे कार अपघातावरून धंगेकरांचा अजितदादांवर निशाणा, ”त्यांची भाषा सैल झालीय, फडणवीसांनी हातपाय बांधून खुर्चीत ठेवलंय” (Video)

Porsche Car Accident Pune | सुरेंद्रकुमार अग्रवालने ड्रायव्हरला खोलीत डांबले; ड्रायव्हरच्या बायकोने आरडाओरडा केल्यानंतर सुटका (Videos)