PCMC News | मंगळसूत्र विकून, सोने गहाण ठेऊन पूर रेषेतील बांधकामांसाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील अधिकाऱ्यांना पैसे दिल्याचा आरोप

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – PCMC News | पिंपरी चिंचवड महानगर पालिकेकडून (Pimpri Chinchwad Municipal Corporation-PCMC) पूर रेषेतील अनधिकृत बांधकामावर (Unauthorized Construction) कारवाई करण्यात आली आहे. या प्रकारात पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्यावर कोणतीही कारवाई होणार नाही असे म्हणत लाखो रुपये खाल्ल्याचा आरोप आता केला जात आहे. तर पालिकेकडून अशांच्या नावासहित तक्रारी देण्याचे आवाहन अतिक्रमण विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर (Manoj Lonkar) यांनी केले आहे.(PCMC News)

कारवाई बाबतचे नेमके प्रकरण काय ?

मोशीतील बोऱ्हाडेवाडीत (Borhade Wadi Moshi) इंद्रायणी नदी पात्रालगतचा (Indrayani River) भूखंड रहिवाशी भाग असल्याचे भासवून आणि त्याची जाहिरात करून २० ते २५ लाख रुपये गुंठ्याने नागरिकांना जागेची विक्री केली. शहरातील कामगार, कष्टकरी, सर्वसामान्य नागरिकांनी जागा घेऊन घरे बांधली. परंतु, पूर रेषेत अनधिकृतपणे बांधकाम होत असताना महापालिका अधिकाऱ्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले. पूर रेषेतील अतिक्रमण, अनधिकृत बांधकामांमुळे नदीचे पात्र अरुंद होवू लागले होते. याबाबत हरित लवादाकडे तक्रार करण्यात आली होती. परंतु, लवादाचे आदेश येण्यापूर्वीच महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली.

याबाबत कारवाई झाल्यानंतर तेथील महिलांनी माध्यमांकडे प्रतिक्रिया दिली आहे.” आम्ही मोलमजुरी करून जगणारी सर्वसामान्य कुटुंबे आहोत. तुम्ही घरे बांधा नंतर ती महापालिकेत नियमानुसार होतील, असे आम्हाला जागा घेताना सांगण्यात आले. नंतर महापालिकेच्या नोटिसा येण्यास सुरुवात झाली. महिन्यापूर्वी महापालिकेची काही माणसे आली. त्यांनी आम्हाला वीस लाख रुपये द्या, तुमच्या घराच्या विटेलासुद्धा कोणी हात लावणार नाही, असे सांगितले. आम्ही मंगळसूत्र विकले, घरातील सोने गहाण ठेवले आणि महापालिकेच्या त्या माणसांना गुढीपाडव्याच्या दिवशी वीस लाख रुपये नेऊन दिले. आता आमच्या घरावर बुलडोझर फिरला. आम्ही दाद कोणाकडे मागायची,” अशी भावना महिलांनी व्यक्त केली.

तसेच ही कारवाई करण्याअगोदर संबंधितांना नोटीस देण्यात आली असल्याचे संबंधित विभागाने सांगितले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

English Is No Compulsory In XI-XII | अकरावी बारावीला आता इंग्रजीची सक्ती नाही; अभ्यासक्रम आराखडा जाहीर

Suhas Diwase On Ujani Dam Backwater Boat Accident | अपघात टाळण्यासाठी उजनी धरणाच्या जलाशयातील बोटींबाबत नियमावली

Maharashtra Board 10th Result 2024 | धाकधूक वाढली! दहावीच्या निकालाची तारीख ठरली