Porsche Car Accident Pune | सुरेंद्रकुमार अग्रवालने ड्रायव्हरला खोलीत डांबले; ड्रायव्हरच्या बायकोने आरडाओरडा केल्यानंतर सुटका (Videos)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Porsche Car Accident Pune | कल्याणीनगर भागात घडलेल्या अपघातामध्ये आता नवनव्या घडामोडी समोर येत आहेत (Kalyani Nagar Accident) . अगरवाल कुटुंबियांच्या वाहनाचा चालक याच्यावर गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी सांगितले आहे.

ड्रायव्हरने कंपनीचे कपडे घातले होते. कंपनीच्या नावाचा युनिफॉर्म होता. विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) आणि सुरेंद्रकुमार अग्रवाल (Surendra Kumar Agarwal) यांनी त्याला हे कपडे घरीच काढून जायला सांगितले, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.

याबाबत अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल यांना पोलिसांनी अटक केली आहे. ही अटक केल्यांनतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. वाहन चालकाला अगरवाल कुटुंबाने डांबून ठेवल्याची माहिती ही त्यांनी दिली आहे.(Porsche Car Accident Pune)

वाहन चालकाच्या कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी आरडाओरडा केल्यांनतर त्याची सुटका करण्यात आली. याबाबत माहिती देताना आयुक्त अमितेश कुमार म्हणाले , ” विशाल अगरवाल आणि सुरेंद्रकुमार अगरवाल यांनी चालक गंगारामला आपल्या घरात डांबून ठेवले होते. त्याचा मोबाईल फोन काढून घेतल्यामुळे घरच्यांशी संपर्क होऊ शकला नव्हता.

आपला नवरा घरी आला नाही म्हणून दुसऱ्या दिवशी गंगाराम पुजारीची बायको नातेवाईकांना घेऊन अगरवाल कुटुंबीयांच्या घरी पोहोचली. अगरवाल कुटुंबियांनी गंगारामला सोडण्यास नकार दिला तेव्हा त्याच्या पत्नीने आरडाओरडा केला. त्यामुळे अगरवाल कुटुंबाने गंगारामला सोडले. अगरवाल यांच्या घरातून पत्नीसह बाहेर पडल्यानंतर गंगाराम घाबरला होता. पण पोलिसांनी परवा त्याचा जबाब नोंदवून घेतला.

काल त्याची प्राथमिक चौकशी करुन आम्ही सुरेंद्रकुमार अग्रवाल यांच्यावर कलम ३४२, कलम ३६५ आणि कलम ३६८अंतर्गत अपहरण, दमदाटी आणि डांबून ठेवण्याचा गु्न्हा दाखल केला. यानंतर सुरेंद्र अगरवालला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले जाईल.

विशाल अगरवाल न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे त्याला आवश्यक ती प्रक्रिया करुन ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली. तसेच ड्रायव्हरला ज्या खोलीत डांबण्यात आले होते, त्यावेळी ड्रायव्हरने जे कपडे घातले होते, ते ताब्यात घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली.

आमिष दाखवून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मी सुरुवातीला दबावात घाबरुन जाऊन जबाब दिला. ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात आली. मी घाबरलो होतो, असे ड्रायव्हरने पोलिसांना सांगितले असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

English Is No Compulsory In XI-XII | अकरावी बारावीला आता इंग्रजीची सक्ती नाही; अभ्यासक्रम आराखडा जाहीर

Suhas Diwase On Ujani Dam Backwater Boat Accident | अपघात टाळण्यासाठी उजनी धरणाच्या जलाशयातील बोटींबाबत नियमावली

Maharashtra Board 10th Result 2024 | धाकधूक वाढली! दहावीच्या निकालाची तारीख ठरली