Ravindra Dhangekar On Ajit Pawar | पोर्शे कार अपघातावरून धंगेकरांचा अजितदादांवर निशाणा, ”त्यांची भाषा सैल झालीय, फडणवीसांनी हातपाय बांधून खुर्चीत ठेवलंय” (Video)
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Ravindra Dhangekar On Ajit Pawar | अजितदादांची भाषा सैल झाली यावरुन दिसते की, देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) अजित पवारांना हातपाय बांधून त्या खुर्चीमध्ये ठेवले आहे. अजितदादांनी कोणत्या अधिकाऱ्यांना आदेश नाही दिले तर ते दादा कुठले? दादा म्हणाले पैसे घेतल्याचे पुरावे धंगेकरांनी आणावेत, ही दादांची भाषा नाही. या कमिशनरला पहिला हाकलून देतो, ही भाषा आहे, असे म्हणत पुण्यातील काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दोघांवर निशाणा साधला. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. (Porsche Car Accident Pune)
रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांच्यावर आरोप केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरावे देण्याची मागणी केली होती यावरून धंगेकर यांनी अजित पवारांना चांगलेच खडेबोल सुनावले.
आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, शासकीय प्रश्नांमध्ये अजित पवारांना किती घेतले जाते आणि त्यांचे किती ऐकले जाते हा महत्वाचा भाग आहे. या प्रकरणापासून अजित पवारांना कोणत्या रोलला कुठे ठेवायचे, कोणता रोल दादांनी करायचा, हे रोल आणखी दादांना मिळाले नाहीत. त्यामुळे दादा प्रचंड अस्वस्थ आहेत.(Ravindra Dhangekar On Ajit Pawar)
धंगेकर पुढे म्हणाले, अजितदादांना हातपाय बांधून पळायला लावले आहे. पण अजित पवार पळू शकत नाहीत.
त्यामुळे गृहमंत्री फडणवीस यांनीच निर्णय घेतले आहेत. अजित पवारांनी पुण्यात आल्यापासून कोणाला काही तंबी दिली नाही.
की कोणाला काही आदेश दिले नाहीत, अशी टीका धंगेकर यांनी केली.
दरम्यान, पुणे पोर्शे कार अपघातावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी आंदोलन केले. तसेच पुणे पोलिसांवर पैसे खाल्ल्याचा गंभीर आरोप केला आहे.
राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप देखील धंगेकर यांनी केला असून
गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Maharashtra Board 10th Result 2024 | धाकधूक वाढली! दहावीच्या निकालाची तारीख ठरली