Amit Shah On Uddhav Thackeray | अमित शाह यांची इंडिया आघाडीवर जोरदार टीका, उद्धव ठाकरेंना त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा असे वाटते…

मुंबई : Amit Shah On Uddhav Thackeray | राहुल गांधी (Rahul Gandhi) पंतप्रधान व्हावेत हे सोनिया गांधी यांचे लक्ष्य आहे. तर उद्धव ठाकरेंना त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा असे वाटत आहे. स्टॅलिन यांनाही त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा असे वाटत आहे. ममता बॅनर्जी यांना त्यांच्या भाचीला सत्तेत आणायचे आहे. यात आघाडी कुठे आहे? या लोकांना आपल्या कुटुंबाचे कल्याण करायचे आहे, अशी जोरदार टीका भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे.

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात अमित शाह यांनी हे वक्तव्य केले. ते पुढ म्हणाले, इंडिया ही आघाडी वगैरे काही नाही. ही आघाडी म्हणजे काही सत्तालोलुप पक्षांचे एकत्र येणे आहे. या लोकांना आपल्या मुलांना, पुतण्याला, भाच्याला मुख्यमंत्री किंवा मंत्री किंवा पंतप्रधान बनवायचे आहे.

इंडिया आघाडीवर टीका करताना अमित शाह पुढे म्हणाले, इंडिया आघाडीकडे संत्र्याप्रमाणे आहे.
संत्रे वरुन दिसताना एकत्र दिसते त्याची साल काढली की आपसुक त्याच्या फोडी वेगळ्या होतात.
२०२४ चा निकाल लागला की हे लोक पळून जातील. मतमोजणीच्या दिवसापासूनच यांच्यात फूट पडेल.
राहुल गांधी आमचे नेते नसते तर आम्ही जिंकलो असतो असेही म्हणतील.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | खडकी परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेरांना अटक, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune Congress-Mohan Joshi | झोपडीधारकांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी व्हावे अन्यथा आंदोलन करू – माजी आमदार मोहन जोशी

Takalkar Classes Tilak Road | पोलिसांच्या मुला-मुलींसह नातेवाईकांसाठी खूशखबर ! टाकळकर क्लासेस टिळक रोड शाखेमध्ये अ‍ॅडमिशन सुरू; 8 वी, 9 वी, 10 वी CBSE व SSC बोर्डासाठी तसेच 11 वी, 12 वी सायन्स विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत