महानायक अमिताभ अन् अभिषेक बच्चनला किमान ‘इतके’ दिवस रूग्णालयात रहावे लागणार

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : कोविड – 19 च्या तपासणीत संसर्गाची पुष्टी झाल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेले बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांच्यावर उपचाराचा चांगला परिणाम दिसून येत आहे. हॉस्पिटलच्या सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली. 11 जुलै रोजी अमिताभ ( 77) आणि अभिषेक (44) यांनी स्वत: संसर्गाची माहिती देताना सांगितले की, ते नानावटी रुग्णालयाच्या स्वतंत्र वॉर्डात दाखल आहेत. रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार “त्या दोघांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना किमान सात दिवस रुग्णालयात रहावे लागेल. ”

कोविड – 19 च्या तपासणीत अमिताभ यांची सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय (46) आणि त्यांची आठ वर्षांची नात आराध्या बच्चन यांनाही संसर्ग झाल्याचे आढळले आहे. रविवारी अभिषेकने ऐश्वर्या आणि आराध्याला संसर्ग झाल्याची माहिती दिली आणि सांगितले की ‘त्या घरातच क्वारंटाईन राहतील”.

सोमवारी रात्री अमिताभ यांनी त्यांच्या चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे त्यांच्या प्रेमळ संदेशांबद्दल आभार मानले. त्यांनी ट्वीट केले की, “तुमच्या प्रार्थना आणि सदिच्छाच्या मुसळधार पावसाने आपुलकी बंधनाचा बांध तोडला आहे. हे अफाट प्रेम मला व्यापून टाकते. तुम्ही माझ्या अलिप्ततेचा अंधार कसा काढून टाकला आहे, त्याचे वर्णन मी शब्दात करू शकत नाही. ते पुढे म्हणाले “मी तुमच्यापुढे नतमस्तक आहे.”

अमिताभ यांना संक्रमणाची पुष्टी झाल्यानंतर त्याच्या बंगल्यातील 26 कर्मचार्‍यांचीही कोविड – 19 चाचणी करण्यात आली . सोमवारी सहाय्यक मनपा आयुक्त विश्वास मोटे म्हणाले की, सर्व कर्मचाऱ्यांच्या तपासणी अहवालात कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्याची पुष्टी नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like