COVID-19 : समोर आले ‘अमिताभ-अभिषेक’चे हेल्थ अपडेट ! स्टाफमधील 26 लोकांची कोरोना टेस्ट Negative

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन कोरोना पॉझिटीव्ह आढळ्यानंतर आता मुंबईच्या नानावती हॉस्पिटलमध्ये भरती आहेत. हॉस्पिटलमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता दोघांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यात कोरोनाची जास्त लक्षण आढलेली नाहीत.

‘अमिताभ-अभिषेक’ची प्रकृती स्थिर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ आणि अभिषेक दोघंही उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसत आहे. बच्चन कुटुंबातील 4 जणांना कोरोना झाल्यानंतर त्यांच्या स्टाफ मेंबर्सचीही कोरोना टेस्ट झाली आहे. बच्चन कुटुंबात असणारा सर्व स्टाफ कोरोना निगेटीव्ह असल्याचं समोर आलं आहे. एकूण 54 लोकं बच्चन कुटुंबाच्या संपर्कात आले होते. रविवारी एकूण 28 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं. याशिवाय 26 लोकं हाय रिस्कवर होती.

26 लोकांचा कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटीव्ह

याच 26 लोकांची कोरना टेस्ट करण्यात आली होती. या सर्व 26 लोकांचा कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. या 14 लोकांनाही पुढील 14 दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये पाठवण्यात आलं आहे.

‘बिग बीं’चे चारही बंगले सील

ऐश्वर्या बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चन कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर होम क्वारंटाईनमध्ये आहेत. बिग बी यांचे चारही बंगले सील करण्यात आले आहेत. बीएमसीनं त्यांना कंटेटमेंट झोन म्हणूनही घोषित केलं आहे. बिग बींनी त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या साऱ्यांचे आभारही मानले आहेत.

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच त्यांचा गुलाबो सिताबो ओटीटीवर रिलीज झाला आहे. याच वर्षात अमिताभ बच्चन अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये ब्रह्मास्त्र, झुंड, चेहरे, अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. यापैकी झुंड सिनेमाचा टीजर आधीच रिलीज झाला आहे. नागराज मंजुळे या सिनेमाचं डायरेक्शन करत आहे. नागपूरमध्ये सिनेमाची शुटींग झाली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like