Twitter वर देखील अमिताभ बच्चन ‘बादशहा’ चं, ‘बिग बी’ चे 40 मिलियन फॉलोअर्स, चाहत्यांनी दिल्या ‘शुभेच्छा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन अशा बॉलिवूड स्टार्सपैकी एक आहेत ज्यांचे फक्त चित्रपटच नाही तर सोशल मीडिया पोस्ट्समुळे त्यांची फॅन फॉलोव्हिंगही वाढते. अलीकडेच अमिताभ यांनी ट्विटरवर 40 मिलियन म्हणजेच 4 कोटी फॉलोअर्स केले आहेत. सोशल मिडीयावर या कामगिरीबद्दल चाहते त्यांचे अभिनंदन करत आहेत.

40 मिलियन फॉलोअर्स बनविल्यामुळे चाहते त्यांचे अभिनंदन करीत आहेत. सध्या अमिताभ यांच्या ट्विटर अकाऊंटवर त्यांना 40,002,202 लोक फॉलो करतात. त्यांचे फॉलोअर्स सामान्य लोकांपासून ते मोठ्या सुपरस्टार्स आणि नेत्यांपर्यंत आहेत. अमिताभ हे अनेकदा आपल्या ट्विटर अकाउंटवर फोटो किंवा कविता शेअर करतात. त्याचबरोबर इन्स्टाग्रामवर अमिताभ यांचे 14.1 मिलियन फॉलोअर्स आहेत.

अमिताभनंतर आता बॉलिवूड स्टार शाहरुख खानचे देखील ट्विटरवर 39.8 मिलियन फॉलोअर्स आहे. अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर लवकरच अमिताभ बच्चन ‘चेहरे’, ‘गुलाबो सीताबो’, ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘झुंड’ मध्ये दिसणार आहेत. या झुंडचा टीझर समोर आला आहे.

या चित्रपटात अमिताभ हे एका फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत, जे गरीब मुलांना प्रवृत्त करून फुटबॉल संघ सुरू करतात. या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी चित्रपट निर्माते नागराज मंजुळे करीत आहेत. चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग नागपुरात झाले आहे. सोमवारी अमिताभ यांनी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. पोस्टरमध्ये ते कॉलनीसमोर उभे राहिलेले दिसत आहे.