Amol Kolhe | अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा घडवले राजकीय सभ्यतेचे दर्शन, यासाठी ‘त्या’ व्यक्तीच्या हातातून घेतला माईक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Amol Kolhe | शिरूर लोकसभा मतदार (Shirur Lok Sabha Election 2024) संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar NCP) गटाचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा आपल्या राजकीय सभ्यतेचे दर्शन घडवले आहे. निवडणूक प्रचारात विरोधकांबद्दल सुद्धा किती तारतम्य बाळगून बोलले पाहिजे, याबाबतची राजकीय सभ्येता अमोल कोल्हे यांनी भोसरी (Bhosari Vidhan Sabha) येथील प्रचारादरम्यान गावभेटीत दाखवली. एक ज्येष्ठ नागरिक माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्याबद्दलची तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करू लागल्यानंतर अमोल कोल्हे यांनी त्यांना थांबवले.(Amol Kolhe)

याबाबत सविस्तर वृत्त असे की, खासदार अमोल कोल्हे रविवारी भोसरी विधानसभेतील इंद्रायणीनगर (Indrayani Nagar Bhosari) भागात प्रचारासाठी आले होते. निओ रिगल सोसायटीत (Neo Regal Society) त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

यानंतर सोसायटीतील रहिवाशी आपले मनोगत मांडण्यास सुरूवात केली.
तेव्हा एक ज्येष्ठ नागरिकाने माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यास
सुरुवात केली. त्यांच्या भाषेतील कडवटपणा जाणवताच कोल्हे यांनी तत्काळ त्यांना थांबवले आणि माईक आपल्या हातात घेतला.

या ज्येष्ठ नागरिकाच्या हातातून माईक घेतल्यानंतर अमोल कोल्हे हे हात जोडून उपस्थितांना म्हणाले, शरद पवार
यांची साथ सोडून गेलेल्यांमुळे सर्वांनाच मनस्ताप झाला, हे खरे असले तरी टीका करताना आपण आपली राजकीय
सभ्यता सोडायची नाही. समोरून राजकारणाचा स्तर घसरला असला तरी आपण आपला स्तर घसरू द्यायचा नाही.

कोल्हे यांचा हा राजकीय सुसंस्कृतपणा पाहून मतदारांनी टाळ्या वाजवल्या.
दरम्यान, शिवनेरी किल्ल्यावरही प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट झाली असता कोल्हे
यांनी त्यांच्या पाया पडून नमस्कार केला होता. रविवारी पुन्हा या राजकीय सभ्येतेचे दर्शन अमोल कोल्हे यांनी घडवले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supriya Sule On Firing Outside Salman Khan House | सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, सुप्रिया सुळेंनी घेतली दखल, म्हणाल्या ”हे गृह खात्याचे अपयश…”