Supriya Sule On Firing Outside Salman Khan House | सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, सुप्रिया सुळेंनी घेतली दखल, म्हणाल्या ”हे गृह खात्याचे अपयश…”

पुणे : Supriya Sule On Firing Outside Salman Khan House | आज पहाटे अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दोन हल्लेखोरांनी ३ राऊंड फायर केले आणि ते पळून गेले. मुंबई पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. घटनेनंतर सलमानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे. तसेच फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी हजर झाली आहे. या घटनेला सुप्रिया सुळे यांनी गृहखात्याला जबाबदार धरले आहे. हे गृहखात्याचे अपयश असल्याचे त्या म्हणाल्या.

या घटनेबाबत एका वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे अत्यंत दुर्दैवी आहे. कारण सलमान खान ज्या भागात राहतो तो भाग खूप प्रसिद्ध आहे. तिथे सकाळी लोक मॉर्निंग वॉकला जातात तसेच भाजीवाले-दुधवाले तिथे येतात, त्यांच्या सुरक्षेचे काय? हे गृह खात्याचे अपयश आहे. सलमानच्या कुटुंबावर दबाव आहे. (Supriya Sule On Firing Outside Salman Khan House)

सुप्रिया सुळे म्हणाल्या, आता आपण पुण्यात आहोत आणि इथे काय चालले आहे ते आपण पाहतो.
हे खूप सुशिक्षित ठिकाण आहे, जिथे लोक शांततेत राहतात. पण इथेही गुन्हेगारी वाढली आहे.
मी आरोप करत नसून ही भारत सरकारने महाराष्ट्रासाठी दिलेली आकडेवारी आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
आज पहाटे ५ वाजताच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला. ३ राऊंड फायरिंग करण्यात आले. घटनेनंतर क्राइम ब्रँचची टीमही घटनास्थळी हजर झाली.
आरोपींना ओळखण्यासाठी आम्ही परिसर आणि आजूबाजूच्या परिसरातील
सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत, असे पोलीस म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sushma andhare | सुषमा अंधारे यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार, ‘त्या’ पत्रकार परिषदेतील छोट्या बाळाच्या उपस्थितीवर आक्षेप

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यावर गुन्हे शाखेची कारवाई, सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त