Amol Kolhe | ‘शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करून देण्याचे आश्वासन देऊन त्याच्या ताटात माती कलवणारे महागद्दार’ – अमोल कोल्हे (Video)

पुणे/मंचर : पोलीसनामा ऑनलाइन – Amol Kolhe | खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांनी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर केलेल्या टिकेनंतर डॉ. कोल्हे यांनी मोहितेंचा जोरदार समाचार घेतला. दिलीप मोहिते पाटील यांच्या वक्तव्याचे आश्चर्य वाटते अस म्हणत कोल्हे यांनी गद्दार कोणाला म्हणतात हे उदाहरणांसह सांगितले. (Amol Kolhe)

अवसरी मध्ये आयोजित केलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्या मेळाव्यात डॉ. कोल्हे बोलते होते. यावेळी देवदत्त निकम, सुरेश भोर, राजू इनामदार, आलू इनामदार, दिलीप पवळे, दत्ता गांजाळे, शेखर पाचुंदकर, राजाराम बाणखेले, नितीन भालेराव आदी यावेळी उपस्थित होते.

खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी केलेल्या वक्तव्याचे सखेद आश्चर्य वाटते अस म्हणत डॉ. कोल्हे म्हणाले, शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करून त्याच्या ताटात माती कलविण्याचे जे पाप भाजपने केलं त्याला गद्दारी म्हणतात. भाजपच्या बेरोजगारी वाढविण्याला गद्दारी म्हणतात. पेट्रोल शंभर च्या पार व गॅस हजाराच्या पार जातो त्याला गद्दारी म्हणतात.

ही गद्दारी उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही केवळ स्वार्थासाठी आणि आपल्यावर होण्याऱ्या कारवाय पासून वाचण्यासाठी त्यांच्याच मांडीवर बसून त्यांचीच पालखी वाहायची याला महा गद्दारी म्हणतात, असं सांगत मोहिते पाटलांना चांगलीच चपराक लगावली.

इतिहासातील हंबीरराव मोहिते खंबीर होते पण हे?

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे उदाहरण देत डॉ. कोल्हे म्हणाले की,
आणि म्हणूनच खेद वाटतो की सगळे उघड्या डोळ्याने दिसत असतानाही असा आरोप करावा लागतो
त्यामुळे असं वाटतं की नक्कीच काहीतरी कमप्लशन असेल

आणि कमप्लशन नसेल तर कुठल्या तरी करवाई पासून वाचण्यासाठी असा महा गद्दारीचा आरोप
करण्याची लाचारी वाघासारख्या नेतृत्वाने करू नये, असा ही टोला डॉ. कोल्हे यांनी लगावला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Accident News | पिंपरी : ओव्हरटेक करताना भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू; ट्रक चालकाला अटक

Baramati Lok Sabha | बारामतीत चालंलय काय? अजितदादांच्या पाठोपाठ आता रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनीही घेतला उमेदवारी अर्ज

Mahavikas Aghadi (MVA) | पुण्यात गुरुवारी मविआची मोठी प्रचारसभा, प्रमुख नेत्यांची उपस्थिती, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे भरणार उमेदवारी अर्ज