खा.डॉ.अमोल कोल्हेंना राष्ट्रवादीमध्ये भलतच ‘डिमांड’ ; ‘हे’ मोठ पद देण्याची कार्यकर्त्यांची मागणी

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस देखील यासाठी मोठ्या प्रमाणात बदल करण्याच्या तयारीत आहे. अनेक संघटनात्मक बदल करण्यात येणार असल्याचे संकेत अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. यामध्ये तरूण चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचेही सांगण्यात येते. त्यामुळे राज्यासह मुंबईत देखील मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येणार आहेत.

यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर मोठी जबाबदारी देणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या आढळराव पाटील यांचा पराभव करत त्यांना मोठा धक्का दिला होता. तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असल्याने आणि छत्रपती संभाजी मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या अमोल कोल्हे यांची लोकप्रियता कशा प्रकारे आपल्या पक्षाला फायदेशीर ठरेल यासाठी राष्ट्रवादी प्रयत्न करताना दिसून येत आहे.

त्यामुळे अमोल कोल्हे यांच्याकडे मुंबईचे प्रभारीपद सोपवण्याचा विचार पक्षाकडून केला जात आहे. मुंबई युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून देखील अशी मागणी करण्यात आल्याने या पर्यायावर विचार होत असल्याची माहिती समोर येत आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात देखील शरद पवार यांनी तरुणांना संधी देण्याविषयी भाष्य केले होते. त्यामुळे या पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांना प्रभारीपद देऊन बसवून मुंबईतील आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे.

आरोग्यविषयक वृत्त

‘या’ कारणामुळे सकाळी उठल्यावर मोबाईलचा वापर शक्यतो टाळाच

यामुळे कारणांमुळें वाढत महिलांचं वजन

फिट राहण्यासाठी दीपिकाचा नवीन फंडा

कॅन्सरच्या मोठ्या सामन्यानंतर सोनाली घेतेय आता हा ‘उपचार’

Loading...
You might also like