Amol Kolhe | ‘बाबा परत असा घोडीवर बसत जाऊ नकोस’; अमोल कोल्हेंना मायेची ‘तंबी’ (Video)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बैलगाडा शर्यतीत (Bullock Cart Race) घोडीवर स्वार होत जनतेला दिलेलं आश्वासन राष्ट्रवादीचे खासदार (NCP MP) डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी पुर्ण केलं. अमोल कोल्हेंचा (Amol Kolhe) घोडीवर बसतानाचा व्हिडीओ महाराष्ट्रातच नाहीतर देशभर व्हायरल झाला. लोकसभा निवडणुकीत दिलेला शब्द कोल्हेंनी खरा ठरवला. याच पार्श्वभूमीवर अमोल कोल्हेंना त्यांच्या मित्राच्या आईने मायेची तंबी दिली आहे.

 

अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचे मित्र शेखर पाचुंदकर यांच्या मातोश्री म्हणजेच लक्ष्मीबाई पाचूंदकर (Lakshmibai Pachundkar) यांनी व्हिडीओ बघितल्यानंतर औक्षण करताना त्यांना तंबी दिली. त्यांना घरी बोलावत, ‘बाबा परत असा घोडीवर बसू नकोस’, असं लक्ष्मीबाई पाचुंदकर म्हणाल्या. याबाबतची माहिती अमोल कोल्हे यांनीच ट्विट करत माहिती दिली.

या मायेच्या तंबीवर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, मातामाऊली अशी काळजी घेतात तेव्हा आणखी बळ मिळतं !. आधी दृष्ट काढली आणि त्यानंतर मायेची तंबी दिल्याचं अमोल कोल्हे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी दिल्यानंतर अनेक शर्यतींचं आयोजन होताना दिसत आहेत. 2019 च्या निवडणुकीमध्ये प्रचार सभेत बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्यावर घाटात बैलजोडीसमोर घोडीवर बसण्याचा मान मिळवेल, असा शब्द कोल्हेंनी दिला होता.

 

दरम्यान, अमोल कोल्हे यांनी पुण्यातील (Pune) निमगाव दावडी येथे शर्यतीचं आयोजन केलं होतं. या शर्यतींच्या इथे जात अमोल कोल्हे यांनी घोडीवर बसत बैलजोडीसमोर बारी मारली. याआधी एका वयस्कर बाबांचा व्हिडीओ (Viral Video) घोडीवर बारी मारतानाचा व्हायरल झाला होता.

 

Web Title :- Amol Kolhe | NCP Leader And MP Dr. Amol Kolhe Bullock Cart Race Pune News

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा