Amol Kolhe | महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांची दैना केल्याने देशातील जनता भाजपा सरकारवर नाराज : अमोल कोल्हे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Amol Kolhe | देशामध्ये सर्वाधिक जागा काँगेस लढत आहे, देशातील वारं बदललंय. महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांची दैना करून ठेवल्यामुळे देशातील जनता भाजपा सरकारवर नाराज आहे. केंद्रात इंडिया आघाडीचे (INDIA Aghadi) वारे वाहू लागलेत. केंद्रातील मोदी सरकार (Modi Govt) जाऊन नवीन सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, असा विश्वास महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) शिरूरचे (Shirur Lok Sabha) उमेदवार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.(Amol Kolhe)

पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोशी येथे बैठक पार पडली. या बैठकीत अमोल कोल्हे बोलत होते. अमोल कोल्हे म्हणाले, प्रियांका गांधी आणि राहुल गांधी या बहीण भावाकडे हा देश संघर्षाचे प्रतीक म्हणून बघत आहे.

अमोल कोल्हे पुढे म्हणाले, दिल्लीतील एक मोठे नेते सांगत होते की, काँग्रेस ही आजगरासारखी प्रचंड अवाढव्य आहे, पण ती सुस्त आहे असे वाटत राहते. तसे आजगराकडे पाहिले की वाटते आजगर सुस्त आहे, पण तोच आजगर भुकेलेला असतो आणि त्याला भक्ष्य दिसते तेव्हा आजगराऐवढी ताकद इतर कोणत्याही प्राण्यात नसते. अगदी तसेच काँग्रेस आहे.

शिवाजी आढळराव पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडताना अमोल कोल्हे म्हणाले, देश पातळीवरची निवडणूक असली तरी विरोधकांकडे प्रचाराचे मुद्दे नाहीत.
म्हणून ते वैयक्तिक पातळीवर टीका करत आहेत.
विरोधी उमेदवार सुरवातीला म्हणाले, २०१९ चा बदला घेण्यासाठी निवडणूक लढवतोय, आता वारे बदलले हे लक्षात आल्यावर म्हणतात माझी शेवटची निवडणूक आहे.

पण कोणाची पहिली निवडणूक असो किंवा शेवटची. त्याने आपले प्रश्न सुटणार नाहीत.
महागाई कमी होणार नाही, की हाताला काम मिळणार नाही.
याचाही विचार मतदारांनी करावा, असे आवाहन अमोल कोल्हे यांनी मतदारांना केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vasant More-Pune Lok Sabha | पुणे लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांनी भरला अर्ज

Pune Police Seized Firearms | पुणे पोलिसांकडून 42 पिस्तुल, 74 जिवंत काडतुसे जप्त; 28 गुन्हेगार गजाआड

JM Road Firing Case Pune | पुण्यात बापानेच दिली मुलाला गोळ्या घालण्यासाठी 75 लाखाची सुपारी! पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितली हकीकत, धक्कदायक कारण आलं समोर (Video)