Amol Mitkari | भंगार पुस्तकाच्या विक्रीसाठी बोरवणकर यांचे अजितदादांवर आरोप – अमोल मिटकरी

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – Amol Mitkari | पुण्याचे माजी पोलीस आयुक्त (Former Pune CP) मीरा बोरवणकर (Meera Borwankar ) यांनी लिहिलेल्या ‘मॅडम कमिशनर’ (Madam Commissioner) या पुस्तकात अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावरुन राजकीय वातावरण तापले आहे. मीरा बोरवणकर यांचा बोलविता धनी हा शरद पवार गटातील (Sharad Pawar Group) नेता असल्याचा दावा अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. तसेच बोरवणकर यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावेत, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावं, असा इशारा मिटकरी (Amol Mitkari) यांनी दिला आहे.

अमोल मिटकरी म्हणाले, मीरा बोरवणकर यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. बोरवणकर यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावेत. नाहीतर कायदेशीर कारवाईला समोर जावं. बोरवणकरांनी आपलं भंगार पुस्तक विकलं जाव यासाठी अजित पवारांवर असे आरोप केले आहेत. याचा बोलविता धनी कोण? ज्याला आमच्याकडे यायचं होतं, मात्र तिकडे राहून दाखवायचं होतं असा नेता आहे. हा आरोप आमच्या व्यक्तीच्या सांगण्यावरुन करण्यात आला आहे. घर का भेदी लंका ढाये असा प्रकार आहे.

सुप्रिया सुळेंना दादांनी ताकद दिली

अमोल मिटकरी (Amol Mitkari) पुढे म्हणाले, त्याग, श्रद्धा आणि समर्पण हे कायम भाजप (BJP)
कार्यकर्त्यांकडून शिकण्याचे गुण असल्याचे म्हणत त्यांनी भाजपची स्तुती केली.
बारामतीमधील संभाव्य मुकाबल्यावर मिटकरींनी वक्तव्य केले आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना
शरद पवारानंतर सर्वाधिक ताकद अजितदादांनी दिली. निवडणुकीत कुणी कुठे आणि कुणामागे उभं रहावं याचं
प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे.

https://x.com/amolmitkari22/status/1713614049903350125?s=20

मिराबाई तुमचा बोलविता धनी कोण?

दरम्यान, अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन मीरा बोरवणकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
मिरा बोरवणकरांना अचानक आत्मचरित्र लिहावं असा साक्षात्कार होणे, आपलं नावंही कुणाला माहिती नाहीं व पुस्तकही
कुणी वाचायला घेणार नाहीं म्हणुन केवळ प्रसिद्धसाठी सोयीच बिनबुडाचे आरोप करत अजितदादांवर टिका करून
पुस्तकाचा खप वाढवणे, मिराबाई तुमचा बोलविता धनी कोण? तो शोधावाच लागेल, असे मिटकरी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena MP Sanjay Raut On CM Eknath Shinde | संजय राऊतांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका; म्हणाले – ‘मुख्यमंत्र्यांना ‘समाजवाद’ शब्द माहित आहे का?’