Amol Mitkari | अमोल मिटकरींचे राज्यपालांबाबतचे ‘ते’ ट्वीट चांगलेच चर्चेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज्यपालांबाबत एक ट्वीट केले असून त्यात राज्यपालांवर टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मध्यंतरी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक वक्तव्य केले होते. त्यावरून राज्यपाल हटवण्याची मागणी विरोधी पक्षाने केली होती. त्यातच राज्यपालांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुंबईतील राजभवन येथे सत्कार करताना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देतानाचा फोटो शेअर केला आहे. यात शिवप्रतिमा देताना व ती स्विकारताना योगी आदित्यनाथ व भगतसिंह कोश्यारी यांनी चपला घातल्याचे दिसत आहे. त्यावरूनच अमोल मिटकरींनी भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्याबाबतचे ट्वीट अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केले आहे.

या प्रकारावर ट्वीट करत अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी लिहिले आहे की, ‘राज्यपालांनी ठरवलेलेच दिसतंय, आम्ही महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या दैवताला किंमत देणार नाही, तुम्ही कितीही आंदोलने करा. बघा हा फोटो बरेच काही दर्शवतोय.. पायात पायतान घालून जर “शिवप्रतिमा” देत असाल आणि बाकी सर्व मुकसंमती दर्शवत असतील तर या प्रकाराला काय म्हणावे?’ असा प्रश्न त्यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून विचारला आहे.

नेमके काय आहे या फोटोमध्ये

या फोटोमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दिसत आहेत. यावेळी शिवप्रतिमा देताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी चपला घातल्याचे दिसत आहे.
राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत याआधी केलेली वक्तव्ये चर्चेत असतानाच या फोटोमुळे एका
नवीन वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. (Amol Mitkari)

Web Title :- Amol Mitkari | governor bhagat singh koshyari seems to have decided that he will not pay respect to legends amol mitkari tweets a photo

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Railway Bharti | राज्यातील दहावी पास तरूणांसाठी सेंट्रल रेल्वेकडून मोठे गिफ्ट; २४२२ जागांसाठी लवकरच होणार भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची पध्दत

Ajit Pawar | पुण्यात अजित पवारांच्या हस्ते दुचाकींना ‘स्वराज्यरक्षक संभाजी महाराज’ आशयाचे स्टिकर