‘कुत्तों को शेरनी कभी जवाब नही देती…’; अमृता फडणवीसांचं ट्विट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तोक्ते चक्रीवादळाने भयानक परिस्थिती निर्माण केली होती. याचा फटका कोकण किनारपट्टीला बसला असून, अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत. त्यामुळे नुकसान झाले आहे. समुद्रात उंचच उंच लाटा उसळल्या होत्या. या वादळावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी शायरी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यात ट्विटर युद्ध रंगले आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्विट करून म्हटले की, ‘जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो, शेरनी कभी पीछे मुड़कर जवाब नहीं देती !’ फडणवीसांच्या या ट्विटनंतर रुपाली चाकणकर यांनीही ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, जंगल की शेरनी शिकार करती है…सर्कस की शेरनी सिर्फ मनोरंजन !, असे म्हणत अमृता फडणवीस यांना टोला लगावला.

दरम्यान, तोक्ते चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील विविध भागांत चांगलाच फटका बसला. असे असले तरी या वादळावरून सोशल मीडियावर नेटिझन्सकडून काहीना काही तरी ट्विट करून भाष्य केले जात होते. त्यासंबंधी जोक्स आणि मिम्सही व्हायरल होत आहेत. त्यातच आता या मुद्यावरून अमृता फडणवीस आणि रुपाली चाकणकर यांच्यामध्ये ट्विटरवर वाक् युद्ध पाहिला मिळत आहे.