Amruta Fadnavis | पुन्हा एकदा अमृता फडवणीस थिरकल्या ‘मूड बना लिया’ गाण्यावर; व्हिडिओ शेअर करत केले चाहत्यांना आवाहन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Amruta Fadnavis | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडवणीस सध्या खूपच चर्चेत आहेत. नुकतेच त्यांचे ‘आज मैंने मूड बना लिया है’ हे गाणे प्रदर्शित झाले. या गाण्यामुळे अमृता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हे गाणे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आता पुन्हा एकदा अमृताने या गाण्याचा हूक स्टेप करत व्हिडिओ शेअर केला आहे. (Amruta Fadnavis)

 

अमृता फडवणीस यांनी पुन्हा एकदा ‘आज मैंने मूड बना लिया है’ या गाण्याचा हुक स्टेप करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना एक आवाहन देखील दिले आहे. यावेळी त्यांनी चाहत्यांना आवाहन देत म्हटले की या गाण्याचे हॅशटॅग वापरून तुम्ही या गाण्यावर रील बनवा आणि तो अपलोड देखील करा. सध्या अमृता फडवणीस यांचा हा व्हिडिओ तुफान वायरल होताना दिसत आहे. (Amruta Fadnavis)

या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट देखील केले आहे. काहीनी कमेंट करत म्हटले की, “जे आवडतं ते करत राहावं…. जगाचा विचार करू नये हे आम्ही तुमच्याकडूनच शिकलो आहे”. तर काहीनी म्हटले की, “डान्स रील वगैरे करण्यासारखा प्रकार देवेंद्र फडवणीस यांच्या पत्नीकडून अपेक्षित नाही”.
“अमृता जोमात देवेंद्र कोमात”, “संगीत क्षेत्रात प्रगती केल्यानंतर आता मामी डान्स कडे वळाल्या”.
अशा एक ना अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहेत. काहींना अमृता फडवणीस यांचा हा हटके अंदाज आवडला आहे,
तर काहींनी त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न देखील केला आहे.

 

आजवर अमृता फडवणीस यांचे अनेक गाणे सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाले आहेत.
त्यापैकी मोरया रे, वो तेरे प्यार का गम, तिला जगू द्या,
शिव तांडव स्त्रोत्म ही गाणी आजवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत.
याला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद देखील दिला आहे.
तर अमृता यांच्या ग्लॅमरस लुकने त्या नेहमीच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असतात.

 

Web Title :- Amruta Fadnavis | amruta devendra fadnavis has shared a video of her hookup step on the song aaj main mood bana liya ay on social media

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Urvashi Rautela | नॅशनल टीव्हीवर अनिल कपूर यांनी उर्वशी रौतेलाची केली होती बेइज्जती; काय आहे ‘ते’ प्रकरण?

Gold-Silver Rate Today | कोरोना काळातील उच्चांकी दराजवळ पोहोचले सोने, जाणून घ्या आजचे दर

Rashi Khanna | अभिनेत्री राशी खन्नाच्या निखळ सौंदर्याने चाहते थक्क; फोटोवर कौतुकांचा वर्षाव