Amruta Fadnavis Bribery Case | अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल करू पाहणार्‍या फरार जयसिंघानीचे राजकीय कनेक्शन आलं समोर, ‘या’ पक्षांकडून लढवली होती ‘ही’ निवडणूक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Amruta Fadnavis Bribery Case | गुन्हेगारी प्रकरणातून वडिलांना बाहेर काढण्यासाठी एका डिझायनरनं थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपये लाच (Amruta Fadnavis Bribery Case) देण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. याप्रकरणी अमृता फडणवीस यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात (Malabar Hill Police Station) एफआयआर (FIR) दाखल केला असून पोलिसांनी डिझायनर अनिक्षाला ताब्यात घेतले आहे. अनिक्षाने वडिलांना सोडण्यासाठी एक कोटी रुपये लाच देण्याचा तसेच ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती दिली.

अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल (Blackmail) करणाऱ्या अनिक्षाचे वडिल अनिल जयसिंघानी (Anil Jaisinghani) याची राजकीय कनेक्शन समोर आलं आहे. अनिल जयसिंघानीने 1995 मध्ये उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत (Ulhasnagar Municipal Corporation Election) काँग्रेसच्या (Congress) तिकिटावर निवडणूक लढवली होती. यामध्ये त्याचा पराभव झाला होता. यानंतर 1997 सालीही तो काँग्रेसच्या तिकिटावर पराभूत झाला. यानंतर 2022 साली तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) तिकिटावर उभा राहिला, त्यावेळी त्याचा विजय झाला होता.

उल्हासनगरमध्ये पोलिसांचे छापे

अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे शाखेकडून उल्हासनगरमध्ये छापा टाकण्यात
आला आहे. बुकी अनिल जयसिंघानी याच्या घरावर मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला.
यावेळी त्याची मुलकी डिझायनर अनिक्षा आणि मुलगा अक्षन दोघे घरात होते. अनिक्षा हिच्या विरोधात मलबार हिल पोलिसांत गुन्हा दाखल आहे. यानंतर ही कारवाई करण्यात आली. यावेळी दोघांनी पोलिसांना उत्तर देण्याचं टाळलं. जयसिंगानी याचा मुलगा अक्षन याने प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल झाला असल्याचा दावा केला आहे. तर मुलीने परीक्षा सुरु असल्याचा बहाणा केला.

Web Title :-  Amruta Fadnavis Bribery Case | amruta fadnavis blackmail aniksha father anil jaysinghani political connection

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political Crisis | 9 महिन्यानंतर सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण, निकाल कधी?

Amruta Fadnavis Bribery Case | अमृता फडणवीसांना एक कोटी लाच देण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सांगितला घटनाक्रम (व्हिडिओ)

Devendra Fadnavis | ह्युंदाई आणि जनरल मोटर्स कंपनीच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट