Amruta Fadnavis | अमृता फडणवीसांची पतीसाठी खास पोस्ट; नागपूर दौर्‍याचे फोटो शेअर करत म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Amruta Fadnavis | शिवसेनेतील (Shivsena) बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर झाले आणि शिंदे – भाजपाचे सरकार (Shinde-BJP Government) अस्तित्वात आले आहे. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांची वर्णी लागल्यानंतर दोघांचेही आपआपल्या मतदारसंघात जल्लोषात स्वागत करण्यात आले. देवेंद्र फडणवीस नागपुरात पोहचल्यानंतर कार्यकर्त्यांनी विमानतळापासून ते त्यांच्या निवासस्थानापर्यंत भव्य मिरवणूक काढली होती. या जल्लोषाची काही छायाचित्रे अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी मुंबईत परतल्यावर सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्ध केली आहेत. नागपुरांच्या प्रेमाने भारावून गेले, असे म्हणत त्यांनी आपल्या भावना फोटो कॅपशनमध्ये व्यक्त केल्या आहेत.

 

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी पोस्ट केलेल्या फोटोंना दिलेल्या कॅपशनमध्ये लिहिले आहे की, देवेंद्र फडणवीस यांचे मंगळवारी नागपूर येथे अकरा वाजता आगमन झाले. विमानतळावर हजारोच्या संख्येने जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी (BJP Workers) त्यांचे जल्लोषात स्वागत केले. विमानतळावरुन बाहेर येताच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली होती.

 

त्यानंतर विमानतळ ते घरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. वर्धामार्गावरील हेडगेवार स्मारकाजवळ त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
यावेळी फटाकांची आतिषबाजी करण्यात आली. रस्त्यादवर दुतर्फा फडणवीस यांच्या स्वागताचे फलक होते.
मोठ्या संख्येने नागपूरकर हजर होते. भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी स्कूटर मिरवणूक काढली.

यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे (MLA Chandrasekhar Bavankule), आमदार परिणय फुके (MLA Parinay Phuke),
आमदार प्रवीण दटके (MLA Praveen Datke), आमदार टेकचंद सावरकर (MLA Tekchand Savarkar), आमदार आशिष जायस्वाल (MLA Ashish Jaiswal), आमदार कृष्णा खोपडे (MLA Krishna Khopde),
आमदार विकास कुंभारे (MLA Vikas Kumbhare), चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार (MLA Kishor Jorgewar),
यांच्यासह मोठ्या संख्येने नागपूरकर उपस्थित होते.

 

अमृता (Amruta Fadnavis) यांनी पुढे लिहिले आहे की, फडणवीस यांच्या आई आणि घरातील इतर महिलांनी त्यांचे औक्षण केले.
उपमुख्यमंत्री बनून परतलेल्या मुलाचे स्वागत फडणवीस कुटुंबियांनी अगदी कडकडून मिठी मारत केले.
मंगळवार व बुधवारी उपमुख्यमंत्री नागपूर शहरात आपल्या कुटुंबासोबत होते. त्यांनी कुटुंबासोबतचे काही फोटोही पोस्ट केले आहेत.

 

अमृता यांनी कॅपशनमध्ये नमूद केले आहे की, देवेंद्र फडणवीसांनी केलेले पुनरागमन हे फारच अभूतपूर्व आहे.
हे पुनरागमन लोकांसाठी, लोकांच्या पाठींब्याने आणि लोकांच्या भल्यासाठी आहे.

 

Web Title :- Amruta Fadnavis | deputy cm devendra fadnavis wife amruta shares photo from nagpur rally says his comeback is phenomenal

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा