Pune Crime | घरफोड्या करणार्‍या सराईत चोरट्यांना कोंढवा पोलिसांकडून अटक, 6 लाखाचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कोंढवा बुद्रुक (Kondhwa Budhruk) आणि परिसरात घरफोड्या करणार्‍या तिघांना कोंढवा पोलिसांच्या (Kondhwa Police) तपास पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 10 गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी चोरट्यांकडून 5 लाख 91 हजार 500 रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. (Pune Crime)

 

रोहित नानाभाऊ लंके (21, रा. विश्रांतवाडी), मंगेश कुमार जाधव (19, भिमनगर, विश्रांतवाडी) आणि सुमित मोहन शिंदे (21, रा. राजीव गांधी नगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. 26 मार्च 2022 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अरविंद खेमचंद जैन (38, रा. कोंढवा बुद्रुक) यांच्या घराचे कुलूप उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश करून 6 लाख 40 हजार रूपयाचा ऐवज चोरून नेला होता. त्याबाबत कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिस हवालदार सतिश चव्हाण, पोलिस नाईक निलेश देसाई आणि गोरखनाथ चिनके यांना घरफोडी करणारे चोरटे हे कोंढवा बुद्रुक येथील पेट्रोल पंपाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती. (Pune Crime)

पोलिसांनी मिळालेल्या माहितीची खातरजमा करून सापळा रचला. सापळा रचून आरोपींना अटक केली.
त्यांच्याकडून दुचाकी, दोन मोबाईल, एक लॅपटॉप, सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण 5 लाख 91 हजार 500 रूपयाचा ऐवज जप्त केला.
सदरील कारवाई पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह आयुक्त संदीप कर्णिक (Jt CP Sandeep Karnik), अप्पर आयुक्त नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),
उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil), सहाय्यक आयुक्त पोर्णिमा तावरे (ACP Pournima Taware),
वरिष्ठ निरीक्षक सरदार पाटील (Senior Police Inspector Sardar Patil),
पोलिस निरीक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानकर (Police Inspector Jagannath Jankar)
आणि संजय मोगले (Police Inspector Sanjay Mogle)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे उपनिरीक्षक स्वप्नील पाटील (PSI Swapnil Patil),
हवालदार सतिश चव्हाण, जोतीबा पवार, तुषार अल्हाट, गोरखनाथ चिनके, निलेश देसाई, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे आणि सागर भोसले यांच्या पथकाने केली आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Kondhwa police arrest burglars seize goods worth Rs 6 lakh

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा