Narayan Rane On Eknath Shinde | एकनाथ शिंदेंच्या बंडाबद्दल विचारताच नारायण राणेंचे मिश्किल भाष्य, म्हणाले…

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Narayan Rane On Eknath Shinde | शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन केलेली बंडखोरी, त्यानंतर कोसळलेले महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government), राज्यात झालेले सत्तांतर, यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (BJP Leader And Union Minister) यांनी मिश्किल भाष्य केले आहे. शिंदे बंड करणार आहेत, याबाबत कल्पना होती का ? असे विचारले असता राणे म्हणाले, हो मी ज्योतिषी आहे. काही दिवसांपूर्वी मी वाशिमला गेलो असताना राज्य सरकार पडणार असे म्हणालो होतो. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. (Narayan Rane On Eknath Shinde)

 

ADV

हे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करु शकणार नाही.
लवकरच सरकार कोसळणार आहे, असे भाकित राणे यांनी यापूर्वी केले होते.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाबद्दल कल्पना होती का ? असा प्रश्न विचारला असता राणे म्हणाले, विचारताच मला याची कल्पना होती,
मी ज्योतिषीही आहे, असे ते म्हणाले.

 

शिवसेना नेते संजय राऊत (Shivsena Leader And MP Sanjay Raut) यांना मेधा किरीट सोमय्या (Medha Kirit Somaiya) मानहानी प्रकरणात मुंबई महानगर दंडाधिकार्‍यांनी अटक वॉरंट जारी (Arrest Warrant) केले आहे.
भारतीय दंडविधानातील IPC 499, 500 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईवर प्रतिक्रिया देताना नारायण राणे म्हणाले, संजय राऊत हे काही धुतल्या तांदळासारखे नाहीत.
त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अटक होणार आहे.
याचा अर्थ आहे की त्यांनी कोणतातरी गुन्हा केला आहे. (Narayan Rane On Eknath Shinde)

शिवसेनेत बंड झाल्याच्या पहिल्या दिवसापासून नारायण राणे हे सातत्याने शिवसेनेला लक्ष्य करत आहेत.
तसेच त्यांचे पुत्र नितेश राणे सुद्धा शिवसेनेवर बोचरी टीका करत आहेत.
नारायण राणे यांनी सावंतवाडीत पत्रकारांशी बोलताना सुद्धा शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे.
ते म्हणाले, शिवसेना संपवायला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरेच (Aditya Thackeray) जबाबदार असून, मुख्यमंत्री असताना त्यांना सरकार वाचवता आले नाही.
याच्यासारखे दुर्देव नाही. आता शिवसेना कदापी उभी राहणार नाही, अशी शापवाणीच राणे यांनी केली.

 

राणे पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आमदार, खासदारांना भेट टाळणे,
मंत्र्यांना तासनतास ताटकळत उभे ठेवणे यामुळेच ठाकरे यांच्या बाबतचा रोष निर्माण झाला आहे. त्यामुळेच आमदार फुटले.

 

Web Title :- Narayan Rane On Eknath Shinde | BJP leader and union minister narayan rane said know about revolt of eknath shinde against shiv sena

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा