Amruta Khanvilkar | अमृता खानविलकरच्या ‘या’ कृत्यामुळे नेटकरी संतप्त; व्हिडिओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम : अभिनेत्री अमृता खानविलकरला (Amruta Khanvilkar) मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर हिंदी बरोबरच मराठी चित्रपटसृष्टी मध्येस्वतःचे स्थान निर्माण केले आहे. अमृता (Amruta Khanvilkar) नुकतीच एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. मात्र यावेळी तिने परिधान केलेल्या ड्रेसमुळे सध्या तिला ट्रोल केले जात आहे.

 

सध्या सोशल मीडियावर अमृताचा एक व्हिडिओ शेअर होताना दिसत आहे. हा व्हिडिओ फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार सोहळा दरम्यानचा आहे. या सोहळ्यात अमृताने वेस्टर्न ड्रेस परिधान केले होते. यामध्ये तिने लाल रंगाचा शर्ट आणि लाल रंगाची पॅन्ट अशा प्रकारचा ड्रेस परिधान केला होता. तर गळ्यात एक साधी चैन आणि न्यूड मेकअप केला होता. याला साजेल अशी अमृताने हेअर स्टाईल देखील केली होती. या लुकमध्ये अमृता खूपच बोल्ड दिसत होती. तिच्या या ड्रेसमुळे सध्या या व्हिडिओवर अनेक कमेंट येताना दिसत आहेत.

 

या व्हिडिओवर एका नेटकऱ्यांनी म्हटले की, “ताई तुम्ही चांगले मराठी कलावंत आहात आणि असे कपडे परिधान करणे तुम्हाला शोभत नाही”.
तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की,” दाक्षिणात्य कलाकारही त्यांची संस्कृती जपतात आणि आपल्याकडेच दुसऱ्यांची संस्कृती जपत आहेत”.
तर एका अति नाराज झालेल्या चाहत्यांनी म्हटले की, “काय बाई मराठी संस्कृत जपा की जरा गरीबसुद्धा अंग झाकायला मागे पुढे करत नाही आणि अतोनात पैसा आल्यावर एवढा भिकारडेपणा छी. . . ”
एकाने म्हटले “बॉलीवुड हॉलीवुडला कॉपी करते आणि मराठी इंडस्ट्रीतले बॉलीवूडची कॉपी करतात”.
असे एक ना अनेक कमेंट या व्हिडिओला येत आहेत. नुकताच अमृता खानविलकरचा (Amruta Khanvilkar) ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. यानंतर आता ती ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमात सहभागी झाली आहे.

 

Web Title :- Amruta Khanvilkar | actress amruta khavilkar get troll after wearing bold dress at filmfare ott awards

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune NCP Protest | राष्ट्रवादी काँग्रेसचा पुणे महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर भव्य मोर्चा

Disha Salian Case | दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; अधिवेशनात फडणवीसांची घोषणा

IPS Rashmi Shukla | रश्मी शुक्ला प्रकरणावरून अजित पवार विधानसभेत आक्रमक