‘पाॅन्डेचरी’ मध्ये झळकणार सई ताह्मणकर व अमृता खानविलकर

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाईन

सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘पाॅन्डेचरी ‘ या चित्रपटात सई ताह्मणकर व अमृता खानविलकर या मराठीतील आघाडीच्या अभिनेत्री एकत्र काम  करणार आहेत. आघाडीच्या दोन अभिनेत्री एकाच चित्रपटात प्रथमच एकत्र येणार आहेत  ही एक उल्लेखनीय गोष्ट आहे.

[amazon_link asins=’B07C4YKR3J,B0794W14FY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1514ca5a-a6b7-11e8-9fcd-d71fc5c03074′]
चित्रपटात वैभव तत्ववादी याचीही भूमिका आहे. सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘गंध ‘,’रेस्टॉरंट ‘,’ वजनदार ‘ इत्यादी चित्रपटात काही चांगले विषय पाह्यला मिळालेत. ‘पाॅन्डेचरी ‘ या नावावरूनच चित्रपटाचे वेगळेपण स्पष्ट होतेय. विशेष म्हणजे हा चित्रपट पूर्णपणे स्मार्ट फोनवर चित्रीत होणार आहे.