‘MRS CM’ नी गायले दिग्गजांसह ‘या’ चित्रपटासाठी गीत 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची सामाजिक कार्यकर्त्या तसेच गायिका म्हणूंनही प्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वी त्या फेमिना मासिकाच्या कव्हरपेजवर झळकल्या होत्या. आता अमृता फडणवीस यांनी एका चित्रपटातील गाण्याकरिता दिग्ग्ज गायकांसोबत गायन केले आहे.
नितिन चौधरी, के.के. मकवानाद्वारा दिग्दर्शित आय एम बन्नी हा चित्रपट १८ जानेवारी २०१९ रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात ‘हम होंगे कामयाब’ हे गीत आहे . या गीताचे संगीतकार ललित पंडित यांनी अनेक गायकांच्या आवाजात रेकॉर्ड केले आहे. विशेष म्हणजे  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील या गाण्याला आपला आवाज दिला आहे.  हे प्रेरणादायी गीत ‘आय एम बन्नी’ या चित्रपटासाठी रेकॉर्ड झाले आहे.’हम होंगे कामयाब’ या गीतासाठी आवाज दिलेल्यामध्ये शान, वैशाली सामंत, कनिका कपूर, शिबानी कश्यप आणि आकृति कक्कड यासारख्या पार्श्वगायकांचा समावेश आहे.
संगीतकार ललीत पंडीत म्हणाले, या गीताची धुन बनवणे माझ्या संगीत कारकिर्दीतला एक प्रेरणादायी प्रसंग आहे. ‘हम होंगे कामयाब’ हे गीत माझ्या ह्रदयाच्या खूप जवळचे आहे. हे एका महिलेचे गीत असल्यामुळे अमृता फडणवीस यांच्यासह सुवा महिला गायकांना संधी देण्याची निर्णय घेतला.हे गीत अशोक झा यांनी खूप सुंदर लिहिले आहे. सर्व महिलांसाठी हे गीत प्रेरणादायी ठरले यावर माझा विश्वास आहे. हे गीत गुरुवारी रिलीज होणार आहे, असे पंडित यांनी सांगितले.