अमूल कंपनी बाजारात आणणार ‘उंटीनी’चं दूध, २५ रुपयांना २०० मिली, जाणून घ्या फायदे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लवकरच दूध उत्पादक कंपनी आता बाजारात उंटीनीचे दूध आणणार आहे. या दूधाची २०० मिली बॉटल बाजारात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमूलचे आर एस सोढी यांनी सांगितले की कंपनी एका आठवड्यात देशभरात पहिल्यांदा २०० मिलीची बॉटलमधून उंटीनीचे दूध बाजार आणण्याचा निर्णय घेतला आहे. सोढी यांनी सांगितले की, २०० मिली लीटरची उंटीनीचे दूध बाजारात २५ रुपये किंमतींना मिळणार आहे.

५०० मिलीलीटर उंटीनीचे दूध –
आर. एस. सोढी यांनी सांगितले की, याचे निर्माण गांधीनगर अमूल डेअरीची अत्याधुनिक निर्माण यंत्रणा तयार करण्यात येत आहे. सोढी यांनी सांगितले की, याच वर्षी जानेवरी महिन्यात अमूलने उंटीनीचे दूध ५०० मिलीलीटरची बॉटल बाजारात आणली होती. याची किंमत ५० रुपये ठेवण्यात आली होती.

उंटीनीचे दूध आरोग्यासाठी फायदेशीर –
ऊंटीनीचं दूध डायबिटीजच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय ठरतो. उंटीनीच्या एक लीटर दूधात ५२ यूनिट इंसुलिन असते. जे अन्य दूधात असणाऱ्या इंसुलिन पेक्षा आधिक आहे. याचे सेवन केल्याने मधुमेह असणाऱ्यांना फायदा होईल. उंटीनीचे दूध लहान मुलांसाठी उपयोगी आहे. याचा फायदा कुपोषित मुलांना होतो. या दूधात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. या दूधाने हडे मजबूत होतात. कँसरवर हे दूध गुणकारी आहे. या दूधाने रक्तातील टॉक्सिन्स दूर होते याने लीवर साफ होते. यात असलेल्या विटामिन मुळे शरीर सुंदर आणि निरोगी होते. संसर्ग होणाऱ्या रोगांवर उंटीनीच्या दूधात विटामिन आणि खनिज भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरीराची रोगप्रतीकारक शक्ती वाढते.

आरोग्यविषयक वृत्त –