‘या’ अभिनेत्रीने केला अब्जाधीश प्रियकराशी साखरपुडा 

मुंबई : वृत्तसंस्था – ‘2.0’, ची अभिनेत्री अ‍ॅमी जॅक्सनने तिचा प्रियकर जॉर्ज पानायिटूसोबत साखरपुडा केला आहे. तिनं आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही खुशखबर चाहत्यांना दिली आहे .अ‍ॅमीने ‘सिंग इज ब्लिंग’ आणि  ‘आय’ अशा  सुपरहिट चित्रपटात काम केले असून अ‍ॅमी जॅक्सनने २०१२ साली रिलीज झालेल्या ‘एक दिवाना था’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

जॉर्ज ब्रिटीश प्रॉपर्टी डेव्हलपर अँड्रस पानायिटूचा मुलगा आहे. त्याचबरोबर हिल्टॉन, डबल ट्री, पार्क प्लाझा यासारखी अनेक आलिशान हॉटेल्स जॉर्जच्या मालकीची आहेत. जॉर्जला एक भाऊ आणि तीन सावत्र बहिणी आहेत. अ‍ॅबिलीटी ग्रुपचा तो संस्थापक असून वयाच्या १६ वर्षी तो या ग्रुपमध्ये सहभागी झाला होता. ज़ॉर्जच्या वडिलांची संपत्ती ही ४०० मिलिअन पाऊंड असल्याचं म्हटलं जात आहे. जॉर्जकडे अनेक आलिशान आणि जगातल्या सर्वात महागड्या गाड्या देखील आहे.
अ‍ॅमीला डेट करण्याआधी जॉर्जचं नाव अनेक महिलांसोबत जोडलं गेलं आहे. पोलिसांना गंभीर मारहाण केल्याप्रकरणी जॉर्ज ६ महिने तुरूंगातही होता. अ‍ॅमी अनेकदा जॉर्जसोबत आपले फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करते. सध्या अ‍ॅमी जॉर्जसोबत दक्षिण आफ्रिकेत सुट्ट्या एन्जॉय  करत आहे.